आर्चीनंतर आता परश्याचा मेकओव्हर, पाहा नवा लूक

लूक सोशल मीडियावर व्हायरल 

Updated: Oct 29, 2019, 01:03 PM IST
आर्चीनंतर आता परश्याचा मेकओव्हर, पाहा नवा लूक

मुंबई : 2016 मध्ये इतिहास घडवणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' हा सिनेमा प्रदर्शित झाला. सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे विक्रम रचले. 100 कोटीचा गल्ला गाठणारा 'सैराट' हा पहिला मराठी सिनेमा ठरला. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेले आर्ची आणि परश्या म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी सगळ्यांना वेड लावून आपली दखल घ्यायला लावली. 

या सिनेमानंतर नॉन आर्टीस्ट ते स्टार कलाकार असा या दोघांचा प्रवास राहिला. 'सैराट' नंतर रिंकू राजगुरूचा मेकओव्हर झाला यानंतर आता अभिनेता आकाश ठोसरने देखील मेकओव्हर केला आहे. परश्याने नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

पहिल्याच सिनेमात अगदी गावरान अवतारात दिसलेला आकाश आता पूर्णपणे वेगळा दिसत आहे. आकाशने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आकाशचे डोक्यावर हॅट, गळ्यात मफलर असा कूल लूक आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

"Don't look back, there is nothing in past, look in the future and win it."

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

"Don't look back, there is nothing in past, look in the future and win it."

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

'सैराट' सिनेमानंतर आकाशने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'फ्रेंडशिप अनलिमिटेड' या सिनेमात काम केलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार हिट ठरला नाही, मात्र आकाशने सगळ्यांच मन जिंकलं. त्यानंतर आकाशने 'लस्ट स्टोरीज' या नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमध्येही काम केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

By the way, I’m wearing the smile you gave me. #smile

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

आकाशच्या आताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा सिनेमा येत्या 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सैराटनंतर नागराज मंजुळे-आकाश ठोसर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.