मुंबई : बहुचर्चित आणि केजीएफचे निर्मात्यांनी बुधवारी खूप मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या पुढील सिनेमा 'सलार' (Salaar First Look) या तेलुगू सिनेमात बाहुबली ऍक्टर प्रभास (Prabhas) लीड रोलमध्ये आहे. सलार मेकर्सने सिनेमामधील प्रभासचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
हे पोस्टर बॅकग्राऊंड ग्रे असून यामधील भाव व्यक्त करत आहेत. प्रभास पोस्टरमध्ये गन घेऊन दिसत असून त्यांचा इंटेंस लूकमध्ये दिसत आहे. पोस्टरसोबत ट्विटमध्ये लिहिलं आहे की, सलारमध्ये प्रभास. द मोस्ट वायोलेंट मेन...
#Prabhas in #SALAAR
THE MOST VIOLENT MEN.. CALLED ONE MAN.. THE MOST VIOLENT!!
Revealing our next Indian Film, an Action Saga.@VKiragandur @prashanth_neel pic.twitter.com/RqaIPwSUiB— Hombale Films (@hombalefilms) December 2, 2020
३० नोव्हेंबरला मेकर्सने २ डिसेंबरला २ वाजून ९ मिनिटांनी मोठी घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट करत फर्स्ट लूक शेअर करणार असल्याचं स्पष्ट केलं नव्हतं. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की प्रशांत आणि प्रभास एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर बुधवार 2 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं असून सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं आहे.
'सलार' चित्रपट पूर्ण अॅक्शनने भरलेला असेल आणि पोस्टरमध्ये प्रभासचा बंदूक घेऊन असलेला लूक बर्यापैकी इन्टेन्स दिसत आहे. प्रशांत नीलने फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'सर्वात हिंसक लोक एका माणसाला सर्वात हिंसक म्हणतात.'
'केजीएफ: भाग 2' च्या शूटिंगनंतरच प्रशांत या चित्रपटावर काम सुरू करणार आहे. प्रभासचे देखील आता 3 चित्रपट आहेत. सध्या तो हैदराबादमध्ये ‘राधे श्याम’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. त्यानंतर तो दीपिका पादुकोणसोबतत नाग अश्विनच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात उतरणार आहे. ओम राऊत याच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये प्रभास रामाच्या भूमिकेत असणार आहे.