वादग्रस्त टॅलेंट कंपनीसोबत सलमानचं नातं ? वकिलाकडून खुलासा

सलमान खानचं नाव देखील जोडलं जातंय.

Updated: Sep 22, 2020, 09:38 PM IST
वादग्रस्त टॅलेंट कंपनीसोबत सलमानचं नातं ? वकिलाकडून खुलासा

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीत बॉलिवुडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येतंय. यामध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटींची नाव येत आहेत. दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांचे नाव मुख्य रुपात समोर आली आहेत. यामध्ये सलमान खानचं नाव देखील जोडलं जातंय. ड्रग्ज वादात फसलेल्या क्वान टॅलेंट कंपनीमध्ये सलमान खानच्या कंपनीचे देखील शेअर्स आहेत.

लीगल टीम म्हणते...

हे वृत्त पसरल्यानंतर सलमान खानच्या लीगल टीमने आपलं स्टेटमेंट जाहीर केलंय. मीडियाच्या एक भाग चुकीच्या पद्धतीने बातमी दाखवत आहे. क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजेंसी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सलमान खानचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात काही संबंध नाही. मीडिया आमच्या क्लाईंटबद्दल चुकीच्या बातम्या पसरवत आहे. असे यात म्हटले आहे. 

सलमान खानचे नाव समोर आल्यानंतर दबंग ३ चे दिग्दर्शक निखिल द्विवेदी त्याच्या समर्थनार्थ आला. ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे त्याने म्हटले होते. सलमान खान किंवा त्याच्या कोणत्याही सहयोगी कंपनीची भागिदारी क्वानमध्ये नाही असे त्याने स्पष्ट केले होते. 

रियाच्या कोठडीत वाढ 

ड्रग्ज रॅकेट प्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्या (Rhea Chakraborty) न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रियाची  न्यायालयीन कोठडी आज संपली. तिला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाच्या चौकशी दरम्यान ड्रग्ज सिंडीकेट प्रकरणात एनसीबीने तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. रिया आणि शौविकने आज हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी  होणार आहे.