Samantha Ruth Prabhu : समांथा रूथ प्रभूची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता तिनं अभिनय क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. सोबतच आता ती ध्यानसाधनेत मनं रमवते आहे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या एका व्हिडीओची. यावेळी तिच्या चेहऱ्यावर काहीतरी उमटलं आहे आणि ते ती चक्क फिल्टरनं लपवते आहे असा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे. त्यामुळे तिचे चाहतेही गोंधळात पडले आहेत. सध्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगलेली आहे यावेळीही तिच्या या व्हिडीओनं चाहत्यांना प्रश्न पडला आहे. सध्या समांथा एक वेगळ्याच आजारातूनही जाते आहे. त्यामुळे तिच्या या आजारपणाचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे समांथाबद्दल रोज नवनवीन अपडेट्स या येत असतात. यावेळी तिच्या या नव्या व्हिडीओची जोरात चर्चा आहे.
मायोसिटिस या आजारानं समांथा ही ग्रस्त आहे. यावेळी या आजाराची ती ट्रीटमेंट घेताना दिसते आहे. यावेळी तिची चेहऱ्यावरही त्याचा परिणाम झाला असल्याची चिंता दिसून येते आहे. यावेळी तिनं तिची त्वचा खराब होण्यामागीलही कारणं सांगितलं आहे. तिच्यामते त्वचेवरील हा परिणाम हा स्टेरॉयडचा शॉट्स घेतल्यानं झालं असल्याचे समजते आहे. यावेळी तिनं हा खुलासा इन्टाग्रामवरून केला आहे. सेलिब्रेटी हे कायमच आपल्या इन्टाग्राम पेजवरून आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी कायमच तयार असतात. कुठल्या ना कुठल्या तरी आयडिया शोधत आपल्या चाहत्यांना ते कसे काय खुश करतील यासाठी काही ना काही प्रयत्न करताना दिसतात.
हेही वाचा : 'अनिल कपूर यांचा आवाज, फोटो चोरण्याचा प्रयत्न केलात तर...' उच्च न्यायलायाचा मोठा निर्णय
तिच्यामते त्वचेवरील हा परिणाम हा स्टेरॉयडचा शॉट्स घेतल्यानं झालं असल्याचे समजते आहे. यावेळी तिनं हा खुलासा इन्टाग्रामवरून केला आहे. यावेळी तिनं आपल्या चाहत्यांसोबत प्रश्नोत्तरांचा गेम खेळायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी एका चाहत्यानं तिच्या साफ आणि सुंदर त्वचेचे कौतुक केले होते. त्यावरून समांथानं त्यामागील कारणंही सांगितलं आहे. त्यावेळी तिनं सांगितले की तिची स्कीन काही सुंदर नाही तर ती फ्लिटर वापरते आहे.
यावेळी गायिका चिन्मयी श्रीपदा हिला टॅग करत विचारलं आहे की माझी चमकणारी त्वचा नक्की कुठे आहे? यावेळी एका फॅननं तिला विचारलं की, तुम्ही तुमच्या चेहऱ्याला तयार करण्यासाठी कुठल्या टॉप 3 गोष्टींचा समावेश करून घेता? ज्या तुम्हाला वास्तवाच्या जवळ ठेवतात. यावेळी ती म्हणाली की, मी खूप धैर्यवान आणि मजूबत झाले आहे आता माझी इच्छाशक्तीही फार पुढे गेली आहे. त्यापुढे ती लिहिते की मी जिंकणार. प्रत्येक गोष्टींवर प्रश्न विचारणं बंद करा. जसं आहे तसं आहे. प्रामणिकपणा आणि खऱ्यापासून आयुष्यात पुढे जा.