ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

 'शिक्षणाचा आयचा घो', लालबाग परळ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, भिंगरी ते त्यांचे गाजले मराठी चित्रपट आहेत. 

Updated: Jan 12, 2019, 07:18 AM IST
ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन  title=

मुंबई : आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नातेवाईक, चित्रपट सृष्टीतील अनेक मंडळी त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस करत होते. दरम्यान किशोर प्रधान यांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त केली जात आहे. किशोर प्रधान यांनी मराठी चित्रपट, मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, हिंदी चित्रपट, छोटा पडदा आणि विविध जाहिरातींमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'शिक्षणाचा आयचा घो', लालबाग परळ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, भिंगरी ते त्यांचे गाजले मराठी चित्रपट आहेत. 

'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटात त्यांनी साकारलेली खट्याळ आजोबांची भूमिका रसिकांच्या मनात घर करून गेलीय. 'जब वुई मेट'मधील त्यांनी साकारलेला स्टेशन मास्तरही लक्षवेधी ठरलाय. पत्नी शोभा यांच्यासह त्यांनी दूरदर्शनवर सादर केलेला गजरा कार्यक्रम लोकप्रिय ठरला. विविध नाटकंही दिग्दर्शित केलीत.