आजारपणासाठी नाहीत 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीकडे पैसे, चार वर्ष आहे बेरोजगार

लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकारांना आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागलं. 

Updated: Jul 6, 2021, 07:16 PM IST
आजारपणासाठी नाहीत 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीकडे पैसे, चार वर्ष आहे बेरोजगार title=

मुंबई : कोरोना विषाणूमुळे प्रत्येकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकारांना देखील आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागलं. अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री शगुफ्ता अलीची प्रकृतीही आता बिकट झाली आहे. त्यांना लॉकडाऊनमध्ये कोणतंही काम मिळत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे आणि त्यांचे आजारही वाढत आहेत.

दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शागुफ्ता अली म्हणाल्या की, ''मी गेली २० वर्षे आजारी आहे. पण त्यावेळी मी तरुण होते म्हणून मी हे सांभाळू शकले. मला तिसऱ्या टप्प्याचा कर्करोग झाला आणि मी त्याचा सामना करून वाचले.. शागुफ्ता अली पुढे म्हणाल्या की, मला गाठ काढण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. मी केमोथेरपी केली. मी माझ्या कामासाठी खूप डेडिकेटेड आहे. शस्त्रक्रियेनंतर मी 17 दिवसांनीही शूटही केलं. त्यावेळी मला दुखापतही झाली होती''.

आयुष्यातील त्रासांविषयी शागुफ्ता अली म्हणाल्या की, ''मी देखील एक्सटेंडेचा सामना केला आहे. माझा पाय मोडला होता. यानंतर मी वडिलांना भेटायला जात असताना माझा आणखी एक भयानक अपघात झाला. माझे हाड दोन भागात तुटलं गेलं आणि मला स्टीलच्या रॉडची मदत घ्यावी लागली. आजही माझ्या पायामध्ये स्टीलची रॉड आहे. याशिवाय मला मधुमेह देखील झाला. मात्र परंतु या सर्व आव्हानांना तोंड देत मी माझ्या कामावर कधीही ईजा होऊ दिली नाही.''

माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच मला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला. आता माझं वय 54 आहे, माझी तब्बेत ढासळत आहे. शुगरमुळे माझ्या पायांवर वाईट परिणाम झाला आहे. माझ्या शुगरची पातळी ताणामुळे वाढली होती. आता माझ्या डोळ्यांवर परिणाम होत आहे आणि मला त्यावर मला उपचार करायचे आहेत. गेल्या वर्षांपासून माझ्याकडे अनेक ऑफर आल्या ज्या अडून राहिल्या आहेत. दरम्यान, मी एकच चित्रपट केला, तोही पूर्ण होऊ शकला नाही. या सगळ्यांमुळे मला आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे.''