10 वर्षांच्या AbRam नं दिली शाहरुख खानची सिग्नेचर पोज; शाळेतील कार्यक्रमाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

AbRam Shah Rukh Khan's signature pose : अबरामनं त्याच्या शाळेच्या कार्यक्रमात दिली बाप शाहरुख खानची सिग्नेचर पोज, व्हिडीओमुळे एकच चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Dec 16, 2023, 12:12 PM IST
10 वर्षांच्या AbRam नं दिली शाहरुख खानची सिग्नेचर पोज; शाळेतील कार्यक्रमाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

AbRam Shah Rukh Khan's signature pose : काल 15 डिसेंबर रोजी संपूर्ण बॉलिवूड हे अंबानींच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत हजरं होतं. त्याचं कारण म्हणजे या शाळेनं वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. आता सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी तिथे का पोहोचले तर त्याचं कारण आहे की त्या सगळ्यांची मुलं ही त्याच शाळेत शिकतात. या कार्यक्रमात किंग खान म्हणजेच शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान आणि लेक सुहाना खानसोबत पोहोचला होता. त्याचं कारण म्हणजे शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम या शाळेत शिकतो आणि तो या कार्यक्रमात नाटक करणार होता. यासाठी ते तिघं अबरामला पाठिंबा देण्यासाठी तिथे पोहोचले होते. 

अबरामनं केलेल्या नाटकातील काही सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एका सीननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे आणि तो म्हणजे, जेव्हा अबरामनं त्याचे वडील म्हणजेच शाहरुख खानची सिग्नेचर पोज दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या नाटकातील सीनमध्ये स्टेजवर असलेला अबराम खान हा अभिनय करताना दिसतोय. त्यावेळई छोट्या अबरामनं शाहरुखची सिग्नेचर पोज करत म्हणाला, मला मिठी मारा, मला मिठी मारायला खूप आवडतं. त्याचवेळी बॅकग्राऊंडला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील गाणं बॅकग्राऊंडला सुरु असतं. तर अबराम त्याच्यासोबत शिकणाऱ्या मुलांना मिठी मारण्या आधी शाहरुखची पोज देताना दिसला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यातील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत अबराम नाटकात अभिनय करत असताना फूड कार्ट सांभाळताना दिसत आहे. तर यावेळी अभिनय करत असताना त्याचा सहकलाकार हा कॉमेडी करताना दिसत आहे. त्यावर अबराम देखील मजेशीर पद्धतीनं उत्तर देताना दिसत आहे. त्याचवेळी समोर प्रेक्षकांमध्ये बसलेला शाहरुख खान, गौरी खान या दोघांना त्यांच्या मुलावर किती गर्व होतोय हे त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. त्याच्या चेहऱ्यावर असलेलं हसू दाखवतंय. तर अबरामची बहीण सुहाना आणि त्याची आजी हे देखील यावेळी खूप आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसले. एक नेटकरी म्हणाला, 'अबराम हा शाहरुखचं एकमेव मुलगा आहे ज्याला अभिनय येतो आणि तोही खूप चांगला. त्याच्या बहिणीपेक्षा जास्त चांगला.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'वडिलांसारखंच केलं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हा सुहाना पेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं डायलॉग्स बोलतो.' 

दरम्यान, शाहरुखविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच 'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तापसी पन्नू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्या दोघांचा एक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. तर या चित्रपटात त्यांच्याशिवाय बोमन ईरानी, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोवर दिसणार आहेत. तर विकी हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.