शाहिद कपूरच्या पत्नीची लिप सर्जरी?,चेहरा ओळखणं झालं कठीण

मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांनी 2015 मध्ये लग्नगाठ बांधली.

Updated: Jul 24, 2021, 03:01 PM IST
शाहिद कपूरच्या पत्नीची लिप सर्जरी?,चेहरा ओळखणं झालं कठीण

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर सिने स्क्रिनवर जरी झळकत नसली तरी तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट कमालीच्या चर्चेत असतात. नुकताच तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडिओ सगळ्यांनाच हैरान करणारा आहे.

मीरा कपूर फिटनेसबाबत खूपच जागरुक आहे. बऱ्याचदा इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत आपलं हेल्थ रुटीन शेअर करताना दिसते. शाहिदची पत्नी मीरा राजपूत-कपूर आपल्या हटके स्टाईल स्टेटमेंटमुळे देखील तितकीच चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती कमालीची अ‍ॅक्टीव्ह असते. 

मीराने केली लिप सर्जरी 
नुकतीच तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक अशी पोस्ट शेअर केलीये जी सगळ्यांनाच हैरान करणारी आहे. मीराने शेअर केलेल्या या व्हिडिओत तिने लिप सर्जरी केल्याचं दिसून येत आहे. या सर्जरीमुळे तिच्या ओढांचा आकारच बदलला आहे.  हा व्हिडिओ समोर येताच अनेकांनी कमेंट करत मीराला "लिप सर्जरी का केली? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. मीराचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

खरंतर मीराने आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची सर्जरी केलेली नाही. मीराने शेअर केलेल्या या व्हिडिओत तिचे ओढ हे खूपच मोठे दिसत आहेत. पण या व्हिडिओच्या शेवटी तिचा सध्याचा ग्लोईंग लूक तिने शेअर केला आहे. तिने या व्हिडिओत इंस्टाग्रामचा फिल्टर वापरला आहे. ज्यामुळे तिचा चेहरा पाहून अनेकजण हैरान झाले होते. तिने या व्हिडिओत स्कीन केअर संदर्भातील टिप्स शेअर केल्या आहेत.

 मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांनी 2015 मध्ये लग्नगाठ बांधली . त्यानंतर मीराने दोन गोंडस मुलांना जन्म दिला. या मुलांच नाव मीशा आणि जैन असं ठेवण्यात आलं आहे.