अभिनेत्री करिश्माचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'शारिरीक संबध ठेवायचे आहे म्हणत, दिग्दर्शकाने माझ्यासोबत...'

दिग्दर्शकाने माझ्याकडे अत्यंत घाणेरड्या नजरेने पाहिलं तो लगेच म्हणाला...

Updated: Oct 8, 2022, 06:39 PM IST
अभिनेत्री करिश्माचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'शारिरीक संबध ठेवायचे आहे म्हणत, दिग्दर्शकाने माझ्यासोबत...' title=

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माता साजिद खान सध्या बिग बॉस 16 मध्ये दिसत आहेत. साजिदने शोमध्ये एन्ट्री घेताच अनेकांनी आक्षेप घेतला आहे. गायिका सोना मोहपात्रा आणि मंदाना करीमी यांच्यासह अनेकांनी बिग बॉसमध्ये त्याच्या समावेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दिग्दर्शकावर MeTooचा आरोप आहे. अशा परिस्थितीत साजिद खानची बिग बॉस एंट्री अनेकांना पसंत नाही.

दरम्यान, दिवंगत अभिनेत्री जिया खानची बहीण करिश्मा हिने साजिदबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. फिल्मी दुनियेत राहताना जिया खानला आलेले सगळे वाईट अनुभव तिने तिच्या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून मांडले आहेत. करिश्माने तिच्या माहितीपटात सांगितलं आहे की, साजिद खान आणि माझी बहीण जिया माझ्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत होते.

मी अनेकदा जियासोबत चित्रपट निर्माता साजिदच्या जागी जायचे. त्यावेळी माझं वय १६ असावं. त्यादरम्यान मी स्ट्रॅपी टॉप घातला होता. मी काहीतरी करायला टेबलावर टेकले होते. यादरम्यान साजिदने माझ्याकडे अत्यंत घाणेरड्या नजरेने पाहिलं. तो लगेच म्हणाला, 'अरे तिला माझ्याकडून शारिरीक संबध ठेवायचे आहेत.'

हे ऐकून माझ्या बहिणीने माझ्या बचावासाठी उडी घेतली. करिश्माने सांगितलं की, जियाने साजिदला उत्तर दिलं की ती लहान आहे आणि तिला याबद्दल काहीही माहिती नाही. करिश्माच्या म्हणण्यानुसार, यानंतर दोन्ही बहिणी निघून गेल्या होत्या.