अभिनेत्री शहनाज गिल जखमी; अवस्था पाहून चाहते चिंतेत

अलीकडेच शहनाजचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत.

Updated: Jul 8, 2022, 06:16 PM IST
अभिनेत्री शहनाज गिल जखमी; अवस्था पाहून चाहते चिंतेत title=

मुंबई : सहसा तुम्ही शहनाज गिलला हसताना पाहिलं असेल, पण अलीकडेच शहनाजचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यात ती वेदनांनी आक्रोश करताना दिसत आहे. एवढंच नाही तर शहनाजच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे ती लंगडत फिरताना दिसत आहे  अभिनेत्रीची ही अवस्था पाहून तिचे चाहते तिची काळजी करत आहेत.

खरंतर शहनाज गिलला दुखापत झाली असून तिनेच ही गोष्ट कॅमेऱ्यासमोर सांगितली आहे. शहनाजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती मल्टी कलर शॉर्ट्स, श्रग आणि व्हाईट टॉपमध्ये खूप छान दिसत आहे. मात्र, तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तिची व्हॅनिटी व्हॅन शहनाजसमोर उभी आहे. पण व्हॅनमध्ये येण्यापूर्वी ती पापाराझींशी बोलत आहे. पापाराझींशी बोलताना शहनाज म्हणाली, 'माझी तब्येत ठीक नाही, मला सहानुभूती दाखवा'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दुसर्‍या व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, इतकं दुखत असूनही शहनाज पापाराझींसाठी पोज देत आहे आणि त्यांना सहकार्य करत आहे. या काळातही ती चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यानंतर, जेव्हा अभिनेत्रीला वेदना असाह्य होतात तेव्हा ती थकून निघून जाते आणि व्हॅनपर्यंत पोहोचण्याआधी तिचे सँण्डल फेकून देते.