शेहनाज आता नॅशनल टीव्हीवर सिद्धार्थसाठी करणार खास गोष्ट

सिद्धार्थसाठी शेहनाज नक्की काय करणार?  

Updated: Jan 26, 2022, 01:45 PM IST
शेहनाज आता नॅशनल टीव्हीवर सिद्धार्थसाठी करणार खास गोष्ट title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या 40 व्य वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या अचानक जाण्यामुळे फक्त चाहत्यांना नाही तर समस्त कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर चाहत्यांना अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेन्ड शेहनाज गिलची चिंता सतावत होती. शेहनाज देखील या दुःखातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. आता तिने सिद्धार्थसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

ज्याठिकाणी सिद्धार्थ आणि शेहनाजच्या नात्याची सुरूवात झाली, त्याचं ठिकाणी शेहनाज पुन्हा दिसणार आहे. 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) फिनाले खास करण्यासाठी निर्मात्यांनी सुरूवात केली आहे. 

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज करतेय लग्न? व्हिडीओमुळे खळबळ

पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल बिग बॉस 15 च्या फिनालेमध्ये दिसणार आहे. 'बिग बॉस' शेहनाजसाठी फक्त एक शो नाही तर, याठिकाणी तिच्या आयुष्यातील खास व्यक्ती तिला भेटला. 

त्यामुळे तिच्या हा शो अत्यंत खास आहे. या शोच्या माध्यमातून शहनाज गिल त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या लक्ष बिग बॉस 15 च्या फिनालेकडे असणार आहे. 

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलला मोठा धक्का बसला. या दु:खातून सावरायला तिला काही महिने लागले. पण आता तिने पुन्हा नव्याने सुरूवात केली आहे. 

बिग बॉस 15 बद्दल सांगायचं झालं तर, निर्मात्यांना टॉप 7 फायनलिस्ट मिळाले आहेत. तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, रश्मी देसाई, करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट आणि राखी सावंत हे शोचे टॉप 7 फायनलिस्ट आहेत. आता या 7 जणांपैकी कोण 'बिग बॉस 15' याकडे सर्वांचं लक्ष आहे.