काय म्हणावं या फॅशनला...शिल्पा शेट्टीचा लूक पाहून आली उर्फी जावेदची आठवण

एक व्हिडीओ व्हायरल झालाय जो पाहून चाहत्यांकडून शिल्पाची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे.  

Updated: May 17, 2022, 01:50 PM IST
काय म्हणावं या फॅशनला...शिल्पा शेट्टीचा लूक पाहून आली उर्फी जावेदची आठवण title=

मुंबईः बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या प्रत्येक लूकने चाहत्यांना प्रभावित करत असते. शिल्पा शेट्टीचा फॅशन सेन्स, स्टाइल, आऊटफिट कायमच चर्चेत असतात. शिल्पा कायमच आपल्या लुक्समध्ये एक्सपेरिमेंट करत असते.

शिल्पा शेट्टीचा आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय जो पाहून चाहत्यांकडून शिल्पाची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे.

शिल्पाची अनोखी साडी, त्यावर बोल्ड ब्लाऊज आणि त्यावर यलो जॅकेट पाहून उर्फी जावेदची आठवण नाही आली तरच नवल.

शिल्पाच्या या फॅशन सेन्सवर चाहत्यांकडून ट्रोल केलं जात आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वीही शिल्पा अनेक वेळा कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे.

फिटनेसबाबत शिल्पा शेट्टी प्रचंड जागरूक आहे. शिल्पा नेहमीच तिचे योगा आणि जीममधील व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहे.

काही दिवसांपूर्वी शिल्पाने रॅम्प वॉकसाठी मल्टिकलर लेहंगा आणि चोली परिधान केली होती तर दुपट्टा हातात घेत शिल्पाने तिची फिगर फ्लॉन्ट केल्याचं दिसून आलं. शिल्पाच्या या लेहेंगा चोलीमध्ये पांढऱ्या आणि लाल रंगांचा अधिक वापर करण्यात आला होता. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, शिल्पाने तिचे केस खुले ठेवले आणि मेकअपसह हाय हील्स घातल्या.