धक्कादायक : 'या' गंभीर आजाराशी झुंज देतेय अभिनेत्री अदा शर्मा

 अदा कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.

Updated: Jun 9, 2024, 08:20 PM IST
धक्कादायक : 'या' गंभीर आजाराशी झुंज देतेय अभिनेत्री अदा शर्मा title=

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अदाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अदा कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. नुकताच अदाने तिच्या आजाराबबात मोठा खुलासा केला आहे. जे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्री एका आजाराशी झुंज देत आहे.  अदा शर्माने  एंडोमेट्रिओसिसचा आजाराशी सामना देतेय. 

नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने स्वतःच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. यावेळी आजाबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, ' सिनेमातील भूमिकांसाठी मला बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची गरज होती. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात मला सडपातळ व्हायच होतं. कारण, एका कॉलेज मुलीप्रमाणे मला दिसायचं होतं. तर 'कमोंडो'साठी मी बलवान असणं गरजेचं होतं. 

पुढे अदा म्हणाली, तर 'बस्तर'सिनेमातील अ‍ॅक्शन सिन्ससाठी मजबूत असणं गरजेचं होतं'.'बस्तर'साठी स्वतःचं मोठ्या प्रमाणात वजन वाढवावं लागलं. वजन वाढवण्यासाठी एका दिवसात मी जवळपास 10 ते 12 केळी खाल्ली होती. वजन वाढत होतं, पण त्यासोबत अनेक समस्या देखील समोर येत होत्या.  शूटिंगदरम्यान आठ किलोच्या खऱ्या बंदुकांचा वापर करावा लागायचा. शूटिंगदरम्यान मला पाठिचं दुखणं सुरू झालं. तसेच एंडोमेट्रिओसिस आजार झाला.  या आजारात मासिक पाळी थांबत नाही. मला सलग 48 दिवस रक्तस्त्राव होत राहिला'.

अदा शर्मा आज बॉलिवूडमधील व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज झाल्या, ज्यामध्ये अभिनेत्रीला खूप पसंती मिळाली. पण या चित्रपटांसाठी अदा शर्माने केलेल्या शारीरिक परिवर्तनाचा तिच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला. अदा शर्माने सांगितले की तिला एंडोमेट्रिओसिसचा त्रास होता.

एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय?
अदा शर्मासाठी 'बस्तर' खूपच तणावपूर्ण होता. या काळात तिला वेट ट्रेनिंगमध्ये खूप अडचणी आल्या. ती एंडोमेट्रिओसिसची शिकार झाली. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये मासिक पाळी थांबत नाही. अदा शर्माने सांगितले की, तिला ४८ दिवस रक्तस्त्राव होत होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x