मुंबई : एक वेळ अशी होती जेव्हा श्रद्धा कपूर आणि फरहान खान एकमेकांच्या प्रेमात डुबून गेले होते. पण कदाचित त्यांच्यामध्ये असे काही राहिले नसल्याची चर्चा आहे. श्रद्धा सध्या 'बाहुबली' प्रभाससोबत 'साहो' मध्ये काम करत आहे.
याच कारणामुळे श्रद्धाने फरहानला सोशल मीडियावरून अनफोलो केल्याचे बोलले जाते. त्यामूळे या दोघांचा ब्रेक अप झाला का ? असा प्रश्न पडणे साहजिक आहे.
ब्रेक अप प्रकरण नेमक कधी झाल याबद्दल कोणाला पुरेशी माहिती नाही. पण फरहान आताही श्रद्धाला फॉलो करतोय. जेव्हा सिद्धार्थ आणि फरहानमध्ये खडके उडू लागले तेव्हा यांची प्रेमकहाणी समोर आली.
एकदा तर वडील शक्ती कपूर यांनी श्रद्धाला फरहानच्या घरून जबरदस्ती परत आणले होते.
सध्या श्रद्धा प्रभास सोबत 'साहो' सिनेमात बिझी आहे. त्यानंतर तिच्याकडे अजून एक सिनेमा आहे. 'बत्ती गुल मीटर चालू' या सिनेमात शाहिदसोबत इलियाना डीक्रूज काम करणार होती पण श्रद्धाने तिला रिप्लेस केले आहे.