Baby Shower: लग्नाच्या 6 वर्षानंतर खास अंदाजात पार पडला श्रेया घोषालचं डोहाळे जेवण, लवकरच श्रेया देणार पहिल्या मुलाला जन्म

श्रेया घोषाल लग्नाच्या सहा वर्षानंतर आई होणार आहे

Updated: Apr 12, 2021, 07:24 PM IST
Baby Shower: लग्नाच्या 6 वर्षानंतर खास अंदाजात पार पडला श्रेया घोषालचं डोहाळे जेवण, लवकरच श्रेया देणार पहिल्या मुलाला जन्म

मुंबई : प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल लग्नाच्या सहा वर्षानंतर आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही घोषणा केली होती. नुकतेच श्रेयाने पुन्हा काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.नुकतचं तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम थोडा वेगळ्या प्रकारे पार पडला. श्रेयाच्या मैत्रिणींनी तिला सरप्राईझ दिलं आहे. सध्या श्रेयाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रेयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये ती म्हणली, ''लांब असूनही जेव्हा तुमच्या मैत्रिणींना तुमचे लाड पुरवायचे असतात. माझ्या 'बावरीजकडून ऑनलाईन सरप्राईझ डोहाळेजेवण. प्रत्येकीने स्वतःच्या हाताने काहीतरी करून पाठवलं. खूप मज्जा आली, खेळही खेळलो. मी किती लकी आहे!”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

श्रेयाच्या मैत्रिणींनी तिला सरप्राईझ देत ऑनलाईन डोहाळेजेवण आयोजित केलं होतं. तिच्या मैत्रिणींनी खास तिच्यासाठी बनवलेले पदार्थही तिला पाठवले होते. मार्च महिन्यात श्रेयाने आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती. श्रेया घोषालने अपने लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड शिलाजीत मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाआधी या दोघांनी एकमेकांना जवळजवळ 10 वर्ष डेट केलं होतं.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रेया घोषाल खूपच खूश दिसत आहे. फोटोंमध्ये ती आपल्या मैत्रिंणीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. यासोबत तिने आपल्या चाहत्यांसह स्वादिष्ट डिशचा फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ दिसत आहेत. हे सगळे पदर्थ श्रेयाच्या सगळ्या मैत्रिणींनी तिच्यासाठी बनवले आहेत. कोरोनामुळे व्हिडिओ कॉलवर तिचं बेबी शॉवर तिच्या मैत्रिंणीनी साजर केलं. शेअर केलेल्या फोटोंवर चाहते श्रेयाचं अभिनंदन करत आहेत.
 
तिला मार्चमध्ये दोन मिर्ची म्युझिक पुरस्कार मिळाले. दशकातली सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून तसंच श्रोत्यांच्या पसंतीची गायिका म्हणूनही तिला गौरवण्यात आलं. सध्या तिचं 'ओ सनम' हे गाणं युट्युबला ट्रेंडिंग आहे. गायक टोनी कक्करने श्रेयासोबत हे गाणं गायलं आहे.