sidharth shukla death : गर्लफ्रेन्डच्या कुशीत सिद्धार्थने घेतला अखेरचा श्वास?

सिद्धार्थच्या शेटवच्या श्वासापर्यंत जवळ होती गर्लफ्रेन्ड

Updated: Sep 3, 2021, 10:58 AM IST
sidharth shukla death : गर्लफ्रेन्डच्या कुशीत सिद्धार्थने घेतला अखेरचा श्वास?

मुंबई :  टीव्ही इडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतला.  ह्रदय विकाराच्या झटक्याने अवघ्या 40व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थचा मृतदेह सध्या कूपर रूग्णालयात आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर सिद्धार्थची गर्लफ्रेन्ड म्हणजे अभिनेत्री शेहनाज गिल काय परिस्थिती असेल? याचा विचार सध्या सर्वांच्या मनत येत आहे. आता शेहनाज स्वतःला कशी सावरेल? अशा अनेक चर्चा रंगत आहे. 

दरम्यान; शेहनाजच्या कुशीत सिद्धार्थने अखेरचा श्वासचा घेतला असं सांगितलं जात आहे. यूट्यूब चॅनेल Fifafooz च्या संचालक सरिता सिंह यांचा संपर्क शेहनाजचे वडील संतोष गिल यांच्या सोबत झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं, 'शेहनाज सध्या पुर्णपणे कोलमडली आहे. तिने मला सांगितलं सिद्धार्थने माझ्या कुशीत अखेरचा श्वाक घेतला. आता मी कशी जगू?...' 

sidharth shukla left shehnaaz gill all alone and left the world sidnaaz  broke | SidNaaz: नहीं रहे 'सिड', अकेली रह गईं 'नाज' | Hindi News, Zee  Hindustan Entertainment

दरम्यान; ह्रदय विकाराच्या झटका आल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताचं डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केलं. शुक्रवारी ब्रह्मकुमारी समाजाच्या पद्धतीने सिद्धार्थवर अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.  

सिद्धार्थ आणि शेहनाजच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बॉस 13 सीझन गाजवलेल्या सिद्धार्थच्या नव्या आयुष्याची सुरूवात या घरातून  झाली. कारण त्याच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली. शेहनाज आणि सिद्धार्थमध्ये प्रेमाचा गुलाब बहरला तो म्हणजे बिग बॉसच्या घरातून. घरातून बाहेर आल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लग्न कधी करणार असा प्रश्न  चाहते विचारायचे.