दोन वर्षानंतर गर्लफ्रेंडसोबत सिद्धार्थच्या नात्याला पुन्हा सुरुवात

'पुन्हा एकदा तुझ्यासोबत मी खूप खुश आहे...'

Updated: Jun 16, 2018, 04:02 PM IST
दोन वर्षानंतर गर्लफ्रेंडसोबत सिद्धार्थच्या नात्याला पुन्हा सुरुवात  title=

मुंबई : कॉमेडियन सिद्धार्थ सागर याच्या आयुष्यात त्याचं जुनं प्रेम परतलंय. दोन वर्षांपूर्वी गर्लफ्रेंड सुबुही जोशी हिच्यासोबत तुटलेलं सिद्धार्थचं नातं पुन्हा बहरतंय. सिद्धार्थच्या वाढदिवसाला दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करून चर्चांणा दुजोरा दिला. 

'पुन्हा एकदा तुझ्यासोबत मी खूप खुश आहे... थॅक्यु सुबुही' असं सिद्धार्थनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना म्हटलंय. 

Im so happy to come back to you...thankyou @subuhijoshi_essjay darling..

A post shared by Sidharth Sagar (@sidharthsagar.official) on

तर 'जे एकमेकांसाठी बनलेले असतात... ते पुन्हा भेटतातच... हॅपी बर्थडे सीडीबॉय. वेलकम होम' असं सुबुहीनं म्हटलंय. 

मार्च महिन्यात एका मित्रानं सिद्धार्थ बेपत्ता असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर सिद्धार्थ चर्चेत आला होता. त्यानंतर मीडियासमोर येत सिद्धार्थनं आपण सुखरुप असल्याचं सांगितलं होतं. 

'कॉमेडी क्लासेज'च्या सेटवर सिद्धार्थ आणि सुबुहीचं प्रेम बहरलं होतं... परंतु, सिद्दार्थच्या आईला मात्र सुबुही पसंत नव्हती... सुबुहीला फोनवर त्यांनी काहीबाही बोलल्यानंतर सुबुहीनं सिद्धार्थशी असलेलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला होता. सुबुही स्प्लिटसविला सीझन ८ मध्येही दिसली होती.