Shehnaaz Gill lifestyle : सिद्धार्थ शुक्लाच्या गर्लफ्रेंडकडे करोडोंची संपत्ती

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलचे खूपच नाव चर्चेत आहे.

Updated: Sep 4, 2021, 10:47 AM IST
Shehnaaz Gill lifestyle : सिद्धार्थ शुक्लाच्या गर्लफ्रेंडकडे करोडोंची संपत्ती title=

मुंबई :  प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलचे खूपच नाव चर्चेत आहे. या दोघांची जोडी टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी मानली जात होती.दिवंगत अभिनेत्याच्या सर्वात जवळची मैत्रिण शेहनाज या अपघातानंतर तुटली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर लोक शेहनाजबद्दल बरेच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चाहत्यांना शहनाजचे आयुष्य आणखी जवळून पाहायचे आहे. तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य सध्या चांगलेच चर्चेत आहे.

सिद्धार्थच्या गर्लफ्रेंडला सलमानच्या शोमुळे मिळाली लोकप्रियता 

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बिग बॉस 13 या रिअॅलिटी शोमध्ये शेहनाज गिल दिसली आणि त्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली. शेहनाज हे पंजाब इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. शेहनाज यारी (गुरु), येस बेबी (गॅरी संधू), लाख लहता (रवनीत सिंग) सारख्या अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. यासोबतच तिने अनेक हिंदी म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेहनाजचं उत्पन्न कोटींच्या घरात 

सोबतच तुम्हाला माहिती आहे का?, की शेहनाज गिल ही करोडोंची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती 30 दशलक्ष म्हणजे 3 कोटी असल्याचं बोललं जात आहे. शेहनाज कोणत्याही कार्यक्रमांच्या प्रमोशनसाठी मोठी रक्कम आकारते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तुम्हाला माहिती आहे का शेहनाज एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 8 लाख रुपये घेते. शेहनाज सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरासरी 10 लाख रुपये घेते. शेहनाजने अलीकडेच मर्सिडीज बेंझ एस गाडीही खरेदी केली आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर  शेहनाजसाठी हा काळ खूप कठीण आहे.