Sidharth Shuklaची 'अधुरी प्रेम काहणी', या 7 टीव्ही अभिनेत्रींसोबत होते प्रेमसंबंध

हे कसं दुर्दैव... प्रत्येक वेळी खऱ्या प्रेमानं दिली हुलकावणी, यावेळी मात्र आयुष्यानंच दिला चकवा... 

Updated: Sep 2, 2021, 02:47 PM IST
Sidharth Shuklaची 'अधुरी प्रेम काहणी', या 7 टीव्ही अभिनेत्रींसोबत होते प्रेमसंबंध title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने अचानक या जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थने अनेकांच्या मनात राज्य केलं. पण  7 टीव्ही अभिनेत्रींनी त्याच्या मनावर राज्य केलं. कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. आता त्याच्या अणि अभिनेत्री शेहनाझ गिलच्या नात्याची चर्चा रंगत होती. सिद्धार्थचं निधन झाल्यामुळे ही प्रेम कहाणी देखील त्याची अधुरी राहिली आहे. शेहनाज आधी 6 अभिनेत्रींसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. 

शेहनाझ गिल

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शेहनाझ गिल एकमेकांना डेट करत असलेल्याच्या चर्चा रंगत होत्या. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. 

आकांक्षा पुरी

सिद्धार्थचं नाव आकांक्षासोबत देखील जोडलं गेलं. पण त्यांचं नात जास्त काळ काही टिकलं नाही. 

शेफाली जरीवाला

बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवण्याआधी शेफालीने सांगितलं की सिद्धार्थ माझा भूतकाळ आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. 

आरती सिंह

दोघे रिलेशनशीपमध्ये होते पण त्याचं नात कधी लग्नापर्यंत पोहोचलं नाही. 

दृष्टि धामी

स्मिता बंसल

पवित्रा पुनिया

दरम्यान; 12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेला सिद्धार्थ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. एका मॉडेलच्या रूपात त्याने करियरला सुरूवात केली. त्यानंतर 2004 साली त्याने अभिनयात पदार्पण केलं. 2008 रोजी त्याने 'बाबुल का आंगन छूटे' या मालिकेत दिसला. 

पण सिद्धार्थला लोकप्रियता 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून मिळाली. ज्याप्रमाणे सिद्धार्थची प्रोफेशनल लाईफ चर्चेत होती त्याचप्रमाणे त्याचं खासगी आयुष्य देखील तितकचं चर्चेत राहिलं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x