मिलिंद गाबा 'या' मुलीला करतोय डेट, बिग बॉसमध्ये जाण्यासाठी थांबवलं लग्न

बिग बॉसबद्दल बोलताना मिलिंद म्हणाला की, दरवर्षी बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला येतो. सुरुवातीला या शोमध्ये कलाकार त्यांच्या कामात खूप व्यस्त असतात.

Updated: Aug 14, 2021, 08:39 AM IST
 मिलिंद गाबा 'या' मुलीला करतोय डेट, बिग बॉसमध्ये जाण्यासाठी थांबवलं लग्न title=

मुंबई : पंजाबी गायक मिलिंद गाबा सध्या 'बिग बॉस ओटीटी'मध्ये दिसत आहे. त्यांची 'नजर लग जाएगी', 'मैं तेरी हो गई', 'नचुंगा ऐसी' आणि 'दिल्ली शहर' ही काही  गाणी जबरदस्त गाजली आहेत. मिलिंद गाबा शोमध्ये खूप छान कामगिरी करत आहे. मिलिंद आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप शांत आहे, पण घराच्या आत जाण्यापूर्वी गायकाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

त्याने आपल्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल खुलासा केला आहे. मिलिंद कोणला डेट करत आहे हे देखील त्याने सांगितले आहे. तो लवकरच मंगेतर प्रिया बेनीवालसोबत  लग्न करणार आहे.

प्रिया बेनीवाल बद्दल बोलताना मिलिंद म्हणाला की हो, मी आधीच माझं हृद्य कोणाला तरी दिलं आहे. प्रिया आणि माझे लग्न गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार होते, पण  बिग बॉसमुळे आम्हाला आमचे लग्न पुढे ढकलावे लागले. प्रिया खूप आनंदी आहे की मी हा शो करत आहे. या शोसाठी मला तिच्या कुटुंबाकडून आणि प्रियाकडून  खूप सहकार्य मिळत आहे. आम्ही 3 वर्षे एकत्र आहोत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MusicMG (@millindgaba)

बिग बॉसबद्दल बोलताना मिलिंद म्हणाला की, दरवर्षी बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला येतो. सुरुवातीला या शोमध्ये कलाकार त्यांच्या कामात खूप व्यस्त असतात. प्रवास  करतात. स्टेज परफॉर्मन्स देत असतात. मी कधीही बिग बॉसचा शो फॉलो केलेला नाही, पण होय मला शोचे स्वरूप चांगले माहित आहे. या शोमध्ये आलेल्या  स्पर्धकांबद्दल आणि यावेळी जे आहेत त्यांच्याबद्दल मला काही प्रमाणात माहिती आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x