अखेर नेहा आणि रोहनप्रीतमध्ये झालंय काय? का मागितली गायिकेने पतीकडे प्रॉपर्टी

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Updated: Apr 1, 2022, 06:25 PM IST
अखेर नेहा आणि रोहनप्रीतमध्ये झालंय काय? का मागितली गायिकेने पतीकडे प्रॉपर्टी  title=

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पण तिचा नवराही या बाबतीत काही कमी नाही. रोहनप्रीत सिंगने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो गाणं गाताना दिसत आहे आणि नेहा त्याचा गाल पकडून म्हणते की, तुझी मालमत्ता माझ्या नावावर कर.

रोहनप्रीत सिंहने शेअर केला व्हिडिओ
मखमली आवाजाने मनं जिंकणारी नेहा कक्कर आज गायनाची सनसनाटी बनली आहे. बॉलीवूडमध्ये तिने गायलेलं प्रत्येक गाणं लोकांच्या मनात घर करून आहे. आणि तिचं प्रत्येक गाणं हिट ठरलं आहे. नेहाला तिचा पती पंजाबी गायक रोहनप्रीतसोबत अनेकदा स्पॉट केलं जातं. दोघांमध्ये खूप प्रेम आहे जे तिच्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये देखील दिसतं. नेहा आणि रोहनप्रीतच्या नुकत्याच आलेल्या एका व्हिडिओने चाहत्यांना थोडं आश्चर्यचकित केलं आहे. ज्यामध्ये नेहा रोहनप्रीतसोबत प्रॉपर्टीबद्दल बोलताना दिसत आहे.

रोहन आणि नेहाचा धमाल व्हिडिओ 
रोहनप्रीत सिंहने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो गाताना दिसत आहे. तेव्हाच नेहाचा आवाज येतो आणि त्याला धक्का बसतो.  रोहनप्रीत 'हम तो दिल दे ही चुके' हे गाणं म्हणत आहे. त्याचदरम्यान नेहा त्याचा गाल ओढून म्हणते, आता तुझी संपत्तीही दे. हे पाहून रोहनप्रीतला धक्का बसतो आहे. यानंतर रोहप्रीत जोरजोरात हसू लागतो.   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ शेअर करत रोहनप्रीतने लिहिलं आहे की, 'व्याह अपनी रिस्क ते ही करवायो'. तर दुसरीकडे, नेहाने कमेंट बॉक्समध्ये मजेशीर पद्धतीने लिहिलं आहे की, 'यार बेबी तुझ्या मालमत्तेशिवाय कसं चालेल.' रोहनप्रीतचा हा फनी व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतोय. त्याचबरोबर, चाहते रोहनप्रीतच्या एक्सप्रेशनला खूप क्यूट म्हणत आहेत आणि तिच्या आणि नेहा कक्करच्या जोडीचे कौतुकही करत आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x