मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा कक्करने (Neha Kakkar) नुकत्याच आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली आहे. एका रिऍलिटी शोच्या मंचावर भावूक होत नेहा कक्करने ही खास बाब चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
नेहा कक्करने आपल्याकडे प्रेम, चांगले कुटुंबीय, करिअर असं सगळं काही असताना एक खंत व्यक्त केली आहे. नेहाला एंग्जाइटी इश्यू असल्यामुळे त्याचा त्रास होत आहे. 'इंडियन आयडल' (Indian Idol 12) च्या मंचावर भावूक होत नेहाने ही खास बाब शेअर केली आहे.
नेहा कक्करने या दिवसांत गाण्याच्या लोकप्रिय रिऍलिटी शो असलेल्या 'इंडियन आयडल 12'मध्ये जजची भूमिका साकारत आहे. या आठवड्यात आईवर स्पेशल एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. चंदीगडमधून आलेल्या अनुष्काने 'लुका छुपी' गाणं गायलं. नेहा कक्कर हे गाणं ऐकून इमोशनल झाली आणि रडू लागली. गाणं ऐकून नेहा रडू लागली तेव्हा तिने सांगितलं की, अनुष्का प्रमाणे मलापण एंक्झायटीचा त्रास आहे.
नेहाच्या आजारपणाबद्दल ऐकल्यावर तिचे चाहते दुःखी झाले आहेत. नेहाने आपलं करिअर देखील एका रिऍलिटी शोमधूनच सुरू केलं आहे.