'या' दिवशी सोनम कपूर आणि आनंद आहूजाचं लग्न, ठिकाणही ठरलं

सोनम कपूर सध्या आपल्या लग्नाच्या तयारीला लागली आहे.

Updated: Apr 9, 2018, 05:39 PM IST
'या' दिवशी सोनम कपूर आणि आनंद आहूजाचं लग्न, ठिकाणही ठरलं  title=

मुंबई : सोनम कपूर सध्या आपल्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. नुकतीच तिने 'वीरे दी वेडींग' सिनेमाचे शूट पूर्ण केलयं. तिच्या लग्नाची तारीख आणि ठिकाणासंदर्भातील बातम्या सध्या चर्चेत आहेत. प्रसिद्ध व्यावसायिक आनंद आहुजा आणि सोनम कपूर गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नवीन वर्षात हे दोघे लग्न करणार असून विवाहस्थळ देखील ठरल्याचे समजते आहे. जोधपूर येथे हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. विवाहस्थळाची बुकींगही झाल्याचे समजतेय. सोनम आणि आनंददेखिल डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा प्लान करत आहेत. हे लग्न पूर्णपणे पंजाबी स्टाईलने होण्याची शक्यता आहे. हे लग्न दिल्ली किंवा उदयपूरमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्या सेलिब्रिटींमध्येही वेडिंग डेस्टिनेशन करण्याचा ट्रेंड आहे. राजस्थानच्या जोधपुर किंवा उदयपुरमध्ये ते लग्न करु शकतात. पण परदेशात जाऊन ते लग्न करणार असल्याचे वृत्त समोर येतयं. जगातील सर्वात महाग शहर ते लग्न करण्यासाठी निवडणार असल्याचं म्हटलं जातयं. ९ ते १२ मेच्या दरम्यान ते लग्न करणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे लग्न स्वीत्झरलॅंडच्या मॉन्ट्रो शहरात होणार आहे. स्विस सरकारनेही याला सकारत्मता दाखविल्याचे म्हटले जातेय. 

आनंदचे कपूर परिवारासोबत उत्तम बॉन्डिंग  

सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर आणि आनंद यांचीदेखील एकमेकांसोबत उत्तम बॉन्डिंग आहे. अनेकदा ते पार्टीमध्ये एकत्र दिसले आहेत. कपुर कुटुंबियांसोबत आनंददेखील अनेकदा दिसला आहे.

जूनमध्ये येणार 'वीरे दी वेडिंग' 

जून महिन्यात सोनमचा 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमादेखील येणार आहे. यामध्ये सोनम सोबत करिना कपूर, स्वरा भास्कर झळकणार आहे.

आनंद आहुजा बिझनेसमॅन 

सोनम कपूर ही अभिनेत्री आहे. तिचे कुटुंबीयही बॉलिवूडमध्ये आहे. मात्र आनंद हा बॉलिवूड किंवा सिनेक्षेत्राशी निगडीत नाही. आनंद अहुजा हा दिल्लीतील एका शूज ब्रॅन्डचा मालक आहे. दोघांची करियर वेगवेगळी असली तरीही अनेक ठिकाणी त्यांची पसंत जुळते. 

सोनम आणि आनंद दोघेही फीटनेस फ्रीक आहेत, बास्केटबॉल खेळाचे ते शौकीन आहेत. काही दिवसांपूर्वी सोनमने तिच्या बॉयफ्रेंडला स्पोर्ट्स बाईक बीएमएक्स गिफ्ट दिली होती.