VIDEO : सोनमच्या 'एक लडकी को...'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

सुरुवातीला दाखल झालेल्या ट्रेलरमध्ये ही एक 'लव्ह स्टोरी' असल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलंच होतं

Updated: Jan 29, 2019, 09:52 AM IST
VIDEO : सोनमच्या 'एक लडकी को...'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या आगामी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. या सिनेमाचं कथानक नेमकं कोणत्या विषयावर आधारलेलं आहे, याची झलक तुम्हाला या ट्रेलरमधून पाहायला मिळेल. या अगोदर सिनेमातील दोन गाणेही प्रदर्शित करण्यात आले आहेत. या गाण्यांनाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. 

सुरुवातीला दाखल झालेल्या ट्रेलरमध्ये ही एक 'लव्ह स्टोरी' असल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलंच होतं. पण या लव्ह स्टोरीत एक वेगळाच ट्विस्ट आहे. हा सिनेमा समलैंगिक नात्यावर आधारीत आहे. यामध्ये सोनम कपूर एखाद्या मुलावर म्हणजे राजकुमार राववर नाही तर एका मुलीवर प्रेम करताना दिसतेय. 

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे. सोनम कपूर पहिल्यांदाच आपल्या वडिलांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमात अभिनेत्री जुही चावलाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.