भारतात मुलाला गायक बनवण्याची इच्छा नाही - सोनू निगम

पुन्हा एकदा सोनूच्या वक्तव्याने लोकांना हैराण केले आहे.     

Updated: Nov 16, 2020, 03:59 PM IST
भारतात मुलाला गायक बनवण्याची इच्छा नाही - सोनू निगम  title=

मुंबई : गायक सोनू निगम कायम त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्याने लोकांना हैराण केले आहे. सोनूने नुकताच 'ईश्वर का वो सच्चा बंदा' हे गाणं प्रदर्शित केलं आहे. गाण्याच्या प्रमोशन दरम्यान तो असं काही बरळला की लोकांना हैरान करत पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, भारतात मुलाला गायक बनवण्याची इच्छा नाही.. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील तो ट्रोल होत आहे. 

सोनूला मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला. तू मुलाला गायक बनवणार आहेस का? या प्रश्नाचं उत्तर देत सोनू म्हणाला की, 'खरं सांगायचं झालं तर त्याने गायक व्हावं अशी माझी बिलकूल इच्छा नाही आणि झाला तरी या देशात नको.' असं वादग्रस्त वक्तव्य त्याने त्याच्या मुलाच्या भविष्याबद्दल केलं आहे. 

शिवाय सोनू म्हणाला की तो आता भारतात राहत नाही. त्याला आधीच दुबईला पाठवण्यात आलं आहे. याक्षणी, माझा मुलगा युएईचा सर्वोच्च गेमर आहे. एक खेळ फोर्टनाइट आहे आणि तो त्याचा टॉप गेमर आहे. त्यामुळे मोठा होवून तो काय होईल, त्याची निवड तो स्वतःकरेल असं देखील तो म्हणाला. 

दरम्यान सांगायचं झालं तर सोनूने  'ईश्वर का वो सच्चा बंदा' या गाण्यावर काम दुबईत राहूनचं केलं आहे. शिवाय काही वर्षांपूर्वी त्याने त्याचा मुलगा नवीन निगमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये नवीनने 'कोलावेरी डी' हे गाणं गायलं होतं.