CBSE बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यावर सोन सूदने व्यक्त केला आनंद

विद्यार्थ्यांचं केलं भरभरून कौतुक 

Updated: Apr 14, 2021, 07:28 PM IST
CBSE बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यावर सोन सूदने व्यक्त केला आनंद  title=

मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळत आहे. व्हायरसचा नवा स्ट्रेन आल्यानंतर सगळ्या गोष्टी अधिक घातक होत आहेत. हे सगळं पाहता सरकारने काही महत्वाचे निर्बंध जाहीर केले आहेत. सरकार जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध करत आहेत. यातच सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता केंद्र सरकारने सीबीएसईच्या 10 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली आहे. 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ट्विट करून आपली प्रतिक्रिया रद्द केली आहे.

केंद्र सरकारमार्फत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सीबीआयने 10 वीची परीक्षा रद्द केली असून 12 वीची परीक्षा पुढे ढकलली आहे. यावर बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आनंद व्यक्त केला आहे. अगदी सुरूवातीपासून परीक्षा रद्द करण्याकडे सोनू सूदचा कल होता. 

यावर अभिनेताने ट्विट केलं होतं की, ज्यामध्ये लिहिलं होतं की, फायनली हे झालंच... प्रत्येक विद्यार्थ्याचं अभिनंदन.' यानंतर त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.