Sonu Sood च्या 'या' सवयीने त्याचा दुधवाला हैराण, म्हणाला,'नाही झेलू शकतं...'

दुधवाला गुड्डू चक्क त्याचा प्रश्न घेऊन सोनू सूदकडे गेला

Updated: May 29, 2021, 11:57 AM IST
Sonu Sood च्या 'या' सवयीने त्याचा दुधवाला हैराण, म्हणाला,'नाही झेलू शकतं...' title=

मुंबई : कोरोनाकाळात अभिनेता सोनू सूदने देवदूताप्रमाणे हजारो नागरिकांची मदत केली आहे. कोरोनाकाळात गेल्या दीड वर्षांपासून अभिनेता सोनू सूद दिवस-रात्र काम करत आहे. सोनूच्या या उपक्रमात त्याचे कुटुंबिय आणि मित्र परिवार देखील सहभागी आहेत. सगळीकडून सोनू सूदचं कौतुक होत असताना अभिनेत्याचा दूधवाला गुड्डू मात्र खूप नाराज आहे. 

दुधवाला गुड्डू चक्क त्याचा प्रश्न घेऊन सोनू सूदकडे गेला आहे. गुड्डू भैयाचा प्रश्न घेऊन सोनू सूदने चक्क व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूदने सोशल मीडियावर दुधवाला गुड्डूचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दूधवाला सांगत आहे की, 'मी सोनू सूदमुळे खूप हैराण आहे. कारण लोकं मला कधी पण फोन करतात आणि सोनू सरांशी बोलून माझी मदत करा. मी या गोष्टीने त्रासलो आहे.'

सोनू यावर त्याला सांगतो की,'जो नागरिकांच्या मदतीसाठी फोन नंबर आहे. त्यावर फोन करायला सांग.' तर गुड्डू दुधवाला अगदी मेताकुटीला येत सांगतो की,'अगदी चुकीच्यावेळी मला फोन केले जात आहेत.' 

अनेक समस्यांसाठी सोनू सूदला ट्विट (Twit)करण्याचे प्रमाण वाढले आहे. असेच एक विचित्र मागणी ट्विटद्वारे सोनू सूदकडे करण्यता आली. एका तरुणीने (Girl) ट्विटरवर सोनू सूदला एक बॉयफ्रेंड (Demand for Boyfriend) मिळवून देण्याची मागणी केली होती. मात्र यातील आश्चर्याचा भाग असा की थोड्याच वेळात या मुलीची मागणी पूर्णदेखील झाली