'कबीर सिंग', 'अर्जुन रेड्डी'मधील अजिरंजितपणा खटकला; अभिनेत्रीचं ठाम मत

टीका करणारे काही कमी नव्हते

Updated: Nov 29, 2019, 10:54 AM IST
'कबीर सिंग', 'अर्जुन रेड्डी'मधील अजिरंजितपणा खटकला; अभिनेत्रीचं ठाम मत  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : 'कबीर सिंग' या चित्रपटाने अभिनेता शाहिद कपूर याच्या कारकिर्दीला एक वेगलीच कलाकटणी दिली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला अनेकांची दाद मिळाली. प्रेमाची एक वेगळी आणि काहीशी चिंचीत करणारी बाजू या चित्रपटातून पाहायला मिळाली. संताप, नात्यातील असुरक्षितता, अती प्रेम, हिंसा हे सारंकाही या चित्रपटातून पाहायला मिळालं. पण, ज्याप्रमाणे कबीर सिंग हा प्रेक्षकांची मनं जिंकून गेला, त्याचप्रमाणे त्याच्यावर टीका करणारेही काही कमी नव्हते.

'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकाला, म्हणजेच संदीप रेड्डी वंगा याच्यावरही टीकांचा भडीमार झाला होता. चित्रपटावर होणारी ही टीका काळ पुढे गेला तशी इतर मुद्द्यांच्या आड गेली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच जोकर हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातही हिंसा दाखवण्यात आली होती. याच चित्रपट आणि हिंसेच्या मुद्दयावर दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वती हिने लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. 

'फिल्म कंपॅनियन'च्या राऊंड टेबल या अनोख्या चर्चासत्रात अनेक कलाकारांची उपस्थिती होती. ज्यामध्ये पार्वतीचं हे वक्तव्य लक्ष वेधणारं ठरलं. या गप्पांच्या सत्रात मनोज बाजपेयी, पार्वती, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आयुषमान खुराना, विजय देवेरकोंडा, विजय सेतुपती अशा कलाकारांची उपस्थिती होती. याचवेळी कबीर सिंग आणि जोकर या चित्रपटांची तुलना सुरु झाली. 

'कोणी एक व्यक्ती महिलेवर हात उगारत आहे, त्याची ही कृती अशा प्रकारे दाखवली हात आहे ज्यावर प्रेक्षकही टाळ्या वाजवतील. हा अतिरंजितपणा झाला. त्याचवेळी पडद्यावर सुरु असणारा प्रसंग योग्य आहे की अयोग्य यासाठी विचार करण्यास तुम्ही इतरांना भाग पाडाल तेव्हात जनतेचा सहभाग तुम्हाला पाहता येईल. पण, आपल्याइथे मात्र या गोष्टी अगदी सर्वसाधारण असल्याप्रमाणे भासवण्यात येतं', असं पार्वती म्हणाली. 

'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंग' या चित्रपटांमध्ये ज्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, त्या पाहता पुरुषांचीही ही कृत्य अतिरंजितपणे दाखवण्यात आल्याचं स्पष्ट होत असल्याचं मत तिने सर्वांपुढे ठेवलं. याचवेळी जोकर या चित्रपटाचंही तिने उदाहरण दिलं. जोकर हा चित्रपट पाहताना आपल्याला त व्यक्ती जे करत आहे, तसंच आपणही करावं असं कधीच वाटलं नाही, हा फरक तिने इथे मांडला. 

'तुम्ही म्हणत आहात की, एकमेकांना कानशिलात मारत नाहीत तोवर ते नातं नाही. मी युट्यूबवर या व्हिडिओवरील प्रतिक्रिया पाहिल्या. तेव्हाच इतर लोकं तुमच्या म्हणण्याशी स्वत:ला जोडू पाहत असल्याची बाब मला जाणवली. तुम्ही हिंसक मुद्द्यांविषयी बोलत आहात आणि मोठ्या संख्येने एक असा वर्ग आहे जो तुमच्याशी स्वत:ला जोडू पाहत आहे. हे खटकणारं आहे', असं पार्वती म्हणाली. 

ती हे वक्तव्य करत असताना 'अर्जुन रेड्डी' साकारणारा अभिनेता विजय देवेरकोंडाही तेथे उपस्थित होता. पण, आपण या चित्रपटात काम केल्यामुळेच पार्वतीच्या म्हणण्याशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. कलाविश्वात 'कबीर सिंग', 'अर्जुन रेड्डी' आणि पार्वतीच्या या स्पष्टवक्तेपणाची बरीच चर्चा झाली.