Holi 2022 : बॉलिवूडच्या गाण्यांनी तुमची होळी होईल आणखी खास

Holi 2022 : होळीसाठी खास बॉलिवूड गाण्यांचा नजराणा   

Updated: Mar 17, 2022, 04:52 PM IST
Holi 2022 : बॉलिवूडच्या गाण्यांनी तुमची होळी होईल आणखी खास title=

मुंबई : रंगांची उधळण करणारा होळीचा सण हा सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच आनंद देणारा असतो. मग कलाकार मंडळी आणि कलाविश्वही त्यापासून दूर राहात नाही. बिग बी अमिताभ बच्चन म्हणू नका किंवा मग कूल डूड रणबीर कपूर सर्वच कलाकार मंडळी या सणाच्या रंगाच अक्षरश: नाहून निघतात. अर्थात त्याला निमित्त असतं ते म्हणजे चित्रपटाचं आणि होळीचं. 

होळीच्या पार्श्वभूमीवर आजवर बॉलिवूडमध्ये साकारण्यात आलेल्या अनेक चित्रपटांमध्ये काही सुरेख गीतं साकारण्यात आली आहेत. काळानुसार या गीतांमध्ये बदलही झाले. पण, त्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन झालं हेही तितकच खरं. अशीच काही होळी आणि रंगपंचमीची गाणी यंदाच्या वर्षीही या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज आहेत. ती गाणी आहेत... 

बलम पिचकारी (ये जवानी है दिवानी)

लेट्स प्ले होली (वक्त)

होली खेले रघुवीरा (बागबान)

अंग से अंग (डर)