विना कपड्यांत टेरेसवर आराम करताना दिसली अभिनेत्री, अंग झाकण्यासाठी घेतला ब्लँकेटचा आधार

हॉटनेसच्या बाबतीतही बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींनाही टिव्ही अभिनेत्री मागे टाकत आहेत.

Updated: Oct 21, 2021, 03:58 PM IST
विना कपड्यांत टेरेसवर आराम करताना दिसली अभिनेत्री, अंग झाकण्यासाठी घेतला ब्लँकेटचा आधार

मुंबई : टीव्ही अभिनेत्री सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेंत्रीपेक्षा कमी नाहीत आणि आता तर हॉटनेसच्या बाबतीतही बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींनाही टिव्ही अभिनेत्री मागे टाकत आहेत. अलीकडेच एका टीव्ही अभिनेत्रीने तिचा अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे. जो फोटो कोणाचंही मन जिंकू शकतो.

सृष्टी रोडेचा ग्लॅमरस अवतार
अभिनेत्री सृष्टी रोडेने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने हॉटनेसच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. या फोटोंत अभिनेत्री कपड्यांशिवाय बेडवर दिसली. तिने अंगावर ब्लँकेट घेतलं आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये सृष्टीने लिहिलंय की, आज मी अशाप्रकारे उठले. तिच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

बिग बॉसमध्ये होती चर्चेत
सृष्टी रोडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते. बिग बॉस 12 मध्ये,  सृष्टी रोडेला देशभरात एक नवीन ओळख मिळाली. त्याचबरोबर या शोने सृष्टीचं आयुष्यही बदललं. शोमध्ये दिसण्यापूर्वी सृष्टीने टीव्ही अभिनेता मनीष नागदेवशी आधीच साखरपुडा केला होता. मात्र शोमध्ये दिसल्यानंतर सुरुवातीचे दिवस सगळं ठीक होतं, त्यानंतर सृष्टी रोडेने अचानक तिचा मनीष नागदेवसोबतचं साखरपुडा तोडला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सृष्टीच्या मालिका
सृष्टी रोडेने 2007 मध्ये 'कुछ ऐसा' या मालिकेत कॅमियोने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर, तिने 'इश्क हाय', 'छोटी बहू', 'शोभा सोमनाथ की', 'चलती का नाम गाडी', 'सरस्वतीचंद्र' आणि 'इश्कबाज' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 2018 मध्ये ती बिग बॉस 12 मध्ये दिसला होती.