Stree 2 Team Member Booked For Sexual Assault: न्यायाधीश हेमा समितीच्या अहवालामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महिलांना मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये कशाप्रकारे दुय्यम वागणूक, भेदभाव सहन करावा लागतो आणि कशाप्रकारे महिलांचं लैंगिक शोषण होतं यासंदर्भातील धक्कादायक वास्तव मांडण्यात आलं आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक महिलांनी समोर येत त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. या अहवालामुळे इतर स्थानिक भाषांमधील चित्रपटसृष्टीवरही याचा परिणाम दिसून येत आहे. लैंगिक अत्याचार केल्यासंदर्भात अनेक धक्कादायक दावे करण्यात आलेल्या मल्याळम मनोरंजनसृष्टीमधील एक दिग्गज नृत्यदिग्दर्शकही यात आकडला आहे.
नृत्यदिग्दर्शक जानीविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जानीला जानी मास्टर नावाने ओखळलं जातं. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, एका 21 वर्षीय तरुणीच्या तक्रारीच्या आधारे जानीविरुद्ध लैंगिक अत्याराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल करणारी तरुणी जानीबरोबरच काम करायची. तिने आपल्या तक्रारीमध्ये जानीने आपला लैंगिक छळ केला तसेच आपल्याबरोबर लैंगिक दुर्व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणमधील हैदराबादमधील रायदुर्गम पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी रात्री हे प्रकरण नरसिंगी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलं. तक्रारदार तरुणी नरसिंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असल्याने हे प्रकरण या पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलं.
मागील काही महिन्यांपासून ही तरुणी जानीबरोबर काम करतेय असं तिने तक्रारीत म्हटलं आहे. "जानीने आपला अनेकदा लैंगिक छळ केला आहे. वेगवेगळ्या शहरांमधील शुटींगदरम्यान हे प्रकार घडले. यामध्ये चेन्नई, मुंबई आणि हैदराबादसारख्या शहरांचा समावेश असून या शहरांमध्ये जानीने आपल्याला लैंगिक अत्याचार तसेच छळ केला, असं या तरुणीचं म्हणणं आहे. नरसिंगी येथील आपल्या घरी येऊनही जानीने अनेकदा आपल्यावर अत्याचार केल्याचं या तरुणीचं म्हणणं आहे. ही तरुणी नरसिंगीमध्ये राहत असल्याने प्रकरण नरसिंगी पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आलं असून ते अधिक तपास करत आहेत," असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
तेलगू आणि तामिळ चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या कामामुळे अल्पावधीत ओळख मिळवलेल्या जानीने 'थिरुचित्राम्बलम' या 2022 च्या चित्रपटामधील 'मेगम करुक्कथा'साठी सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता धनुष आणि निथ्या मेनन प्रमुख भूमिकेत होते. जानीला तीन दाक्षिणात्य फिल्मफेअर पुरस्कार आणि तीन एसआयआयएमए पुरस्कारही मिळाले आहेत. जानाने हिंदी चित्रपटांसाठीही काम केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्री 2' च्या टीममध्येही जानी होता. जानीने या चित्रपटातील 'आई नाही' गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे.
जानीने 'जेलर' (2023) चित्रपटातील 'कावला', 'वरिसु' (2023) चित्रपटातील 'रंजीथम' आणि 'थे थालापति'सारख्या गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तसेच 'बीस्ट' (2022) चित्रपटातील 'अरेबिक कुथु' आणि 'पुष्पा: द राइज' (2021) चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्याच्या स्टेप्सही जानीच्याच आहेत. या गाण्यांची यादी पाहिल्यास सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्यांच्या स्टेप्स मागे जानीच असल्याचं लक्षात येतं. हाच जानी आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.