VIDEO : सनी लिओनीचा सायकल स्टंट व्हायरल

१६ लाखहून अधिक लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे

Updated: May 31, 2019, 05:29 PM IST
VIDEO : सनी लिओनीचा सायकल स्टंट व्हायरल title=

मुंबई : सनी लिओनी सध्या तिच्या जेसीबी फोटोमुळे चर्चेत आहे. सनीच्या त्या फोटोमुळे जेसीबी हा ट्रेंडही व्हायरल झाला होता. सनी लिओनी सध्या तिच्या एका रिअॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगदरम्यानचा सनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १६ लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

सनीने स्टंटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सनी रस्त्यावर बसली असून तिने गुलाबी रंगाचं हेलमेट घातलं आहे. या व्हिडिओत एक मुलगा सायकलवरुन स्टंट करताना दिसतोय. बाजूला रणविजय सिंहही दिसत आहे. 

 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे की त्यावर कोणतीही गोष्ट लगेच ट्रेंड होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही सनी लिओनी टॉप ट्रेंड लिस्टमध्ये होती. निवडणुकांच्या निकालावेळी एका न्यूज अँकरने चुकून सनी देओलच्या जागी सनी लिओनी असं म्हटलं होतं. त्यानंतर तो व्हिडिओही ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये होता. या तुफान ट्रेंडनंतर सनीनेही त्यावर प्रतिक्रिया दिली होती.