सनी लिओनीची पॉर्न इंडस्ट्रीत एन्ट्री आणि पालकांची प्रतिक्रिया

'करनजीत कौर' सीरिजच्या शूटिंग दरम्यान बऱ्याचवेळा सनी सेटवर रडलीदेखील आहे

Updated: Mar 11, 2021, 08:11 PM IST
 सनी लिओनीची पॉर्न इंडस्ट्रीत एन्ट्री आणि पालकांची प्रतिक्रिया title=

मुंबई: अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र तिच्याकडे अजूनही अभिनेत्री म्हणून तितकसं लक्ष दिलं जात नाही. मात्र तिच्या डान्सने ती सर्वांची मन जिंकते. सनीने 'बेबी डॉल' ते 'लैला मे लैला' अशा अनेक आयटम साँग्सवर डान्स करत चाहत्यांना घायाळ केलं आहे.  या गाण्यानंतर सनीला आयटम गर्ल म्हणून ओळख मिळाली. आयटम साँग्समुळे सनी काल विश्वात लोकप्रिय चेहरा बनली.

सनीचा एक काळ होता ज्यावेळेस ती पॉर्नस्टार होती. 'करनजीत कौर' ही वेबसिरीज सनी लिओनीच्या जीवनावर आधारित आहे. सनीची ही वेबसीरिज बरीच चर्चेतही होती. या वेबसीरिजच्या माध्यमातून सनीचं संपूर्ण आयुष्य उलगडण्यात आलं आहे. सनीचा जीवनप्रवास पाहिल्यानंतर तिची एक वेगळी बाजू देखील चाहत्यांसमोर आली. स्वत: सनीसाठी ही वेबसिरीज खूप खास आहे.

'करनजीत कौर' सीरिजच्या शूटिंग दरम्यान बऱ्याचवेळा सनी सेटवर रडलीदेखील आहे. कित्येकवेळा तिचं इमोशनल ब्रेकडाउन झालं आहे. याविषयी सनीने एका मुलाखतीमध्ये काही खुलासे केले आहेत.

एका मुलाखती दरम्यान ती म्हणाली, ''मी रोज सेटवर रडायचे, करनजीत कौर या सीरिजचं शूट करणं माझ्यासाठी फार कठीण होतं. जेव्हा आपले आई- बाबा दुनियेत नसतात. तेव्हा आपण त्यांना खूप मिस करु लागतो. माझ्यासोबतही असचं  झालं... सनीने असं पण म्हटलय की, तिच्या आयुष्यातील घडलेल्या नाट्यमय वळणाचा तिच्या पालकांवर परिणाम झाला.

अशा परिस्थितीत जेव्हा सनी बोल्ड सिनेसृष्टीत गेली. तेव्हाही तिच्या परिवाला खूप भोगावं लागलं. माझे आई बाबा माझ्यावर खूप नाराज झाले होते. ते खूप दुखी असायचे. त्यांना दुःखी पाहून मी सुद्धा दुःखी व्हायचे. माझा भाऊसुद्धा माझ्यावर खूप नाराज असायचा. मात्र तरी देखील मला सपोर्ट करायचा प्रयत्न करायचा.

कधी-कधी आपल्याला या गोष्टीची जाणीवदेखील नसते आपण जे निर्णय घेतो. त्या निर्णयाचा दुसऱ्यांच्या जीवनावर काय परिणाम होत आहे. माझ्यासोबत पण असचं झालं. पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची ही कहाणी 'करनजीत कौर' या वेबसीरिजमधून मांडण्यात आली आहे.