सुशांतच्या 'त्या' आठवणींनी आजही अंकिता भावूक

पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणीत 

Updated: Jan 16, 2021, 10:21 AM IST
सुशांतच्या 'त्या' आठवणींनी आजही अंकिता भावूक

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) अशा अचानक जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला. मात्र या सगळ्यात जास्त सफर झाली ती सुशांतची एक्सगर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे. (Ankita Lokhande) अंकिता लोखंडे आजही सुशांतला विसरू शकलेली नाही. सोशल मीडियावर अंकिताने एक व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

मकरसंक्रांत निमित्त  अंकिताने पतंग उडवताना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘काई पो चे’ या चित्रपटातील गाणं बॅकग्राऊंडला सुरु असल्याचं ऐकू येत आहे. “हे गाणं ऐकून आजही अंगावर काटा येतो. काय चित्रपट होता तो. खूप आठवणींसोबत”, असं कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

दरम्यान, ‘काई पो चे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने ‘छिछोरे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘केदारनाथ, ‘सोनचिडिया’,’दिल बेचारा’,’पीके’, ‘एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र, १४ जून २०२० रोजी त्याचं निधन झालं. 

अंकिताने या अगोदरही एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओतून तिने सुशांतला आदरांजली वाहिली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. व्हिडिओत अंकिता लोखंडे डान्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. 

बॅकग्राऊंडमध्ये नेहा कक्कड आणि जुबीन नोटियालच्या गाण्यावर 'तारों के शहर में' डान्स करत आहे. व्हिडिओ शेअर करताना अंकिता लोखंडेने म्हटलंय की,'यावेळी परफॉर्म करणं थोडं वेगळं आहे. माझ्याकडून तुला खूप प्रेम... हे खूप त्रासदायक आहे. सोबतच अंकिताने सुशांत सिंह राजपूत, पवित्र रिश्ता म्हणतं हॅशटॅगचा वापर केला आहे.