सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी केला खुलासा

सुशांत सिंह राजपूतवर आज होणार अंत्यसंस्कार 

Updated: Jun 15, 2020, 08:07 AM IST
सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी केला खुलासा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा पोस्टमार्टम रिपोर्ट रविवारी रात्री उशिरा आला आहे. यामध्ये डॉक्टरांनी त्याने आत्महत्याच केल्याच म्हटलं आहे. पोस्ट मार्टेम कूपर रूग्णालयात करण्यात आलं. सुशांत सिंहने स्वत:च गळफास घेतल्याचे या रिपोर्टमध्ये समोर आले आहे. कूपर रूग्णालयात रात्री उशिरा पोस्ट मार्टेमची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

तसेच सुशांत सिंह राजपूतच्या शरिरात ड्रग्स किंवा विष होतं की नाही याकरता त्याचे महत्वाचे अवयव जेजे रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रविवारी अचानक सुशांत सिंहच्या निधनाची बातमी समोर येताच साऱ्यांना धक्का बसला. जवळपास दुपारी ३.३० च्या सुमारास त्याचं शव कपूर रूग्णालयात आणण्यात आलं. बॉलिवूडमध्ये सुशांतने केला होता प्रचंड स्ट्रगल; पहिली कमाई अवघी २५० रुपये

मुलाच्या आत्महत्येची बातमी एकताच सुशांत सिंहच्या वडिलांना धक्का बसला. त्याचे वडिल आज मुंबईत येणार आहेत. तसेच सुशांत सिंहची बहीण चंदीगढवरून मुंबईत आली आहे. मुंबईत आज सुशांत सिंहच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ३४ वर्षीय सुशांत सिंहच्या जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. 

याच दरम्यान क्राईम ब्रांचची टीम सुशांत सिंहच्या घराची तपासणी करत आहे. सुशांत सिंह डिप्रेशनमध्ये होता. त्यावर तसे उपचार देखील सुरू होते. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास दहा वाजता सुशांत सिंह त्याच्या रूममधून बाहेर आणि ज्यूसचा ग्लास आत घेऊन गेला ते बाहेर आलाच नाही. (सहा महिन्यांपूर्वीच सुशांत राहायला आला होता वांद्य्रात; घराचे भाडे ऐकून व्हाल थक्क) 

सुशांतच्या निधानानंतर चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. हे असं काही तरी होईल, याची मला आधीच कल्पना होती. सुशांत आधीपासूनच डिस्टर्ब होता, असं मुकेश भट्ट म्हणाले.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत मुकेश भट्ट यांनी सांगितलं की, 'सुशांत आणि मी 'आशिकी 2' आणि 'सडक 2' या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याबाबत बोलण्यासाठी जवळपास दीड वर्षांपूर्वी भेटलो होतो. त्यावेळी त्याच्याशी बोलताना, त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं होत असल्याची जाणीव झाली होती.'सुशांत सिंह राजपूत नोव्हेंबर महिन्यात करणार होता लग्न

'चित्रपटाविषयी बोलताना सुशांत खूप डिस्टर्ब वाटत होता. माझ्याशी बोलताना तो मनाने माझ्यासोबत नव्हता. त्याचवेळी त्याच्यासोबत काही चुकीचं घडत असल्याची जाणीव मला झाली,' असं भट्ट म्हणाले.