लक्झरी कारचा चाहता असलेल्या सुशांतच्या गाड्यांचा नंबर एकसारखाच

या क्रमांकाच्या दोन लक्झरी कार 

Updated: Jun 17, 2020, 02:53 PM IST
लक्झरी कारचा चाहता असलेल्या सुशांतच्या गाड्यांचा नंबर एकसारखाच

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. ३४ वर्षीय सुशांत असा अचानक गेल्यामुळे सगळ्यांनाच याचं दुःख आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याच्याबद्दल आणखी जोरदार चर्चा रंगू लागली. 

सुशांत लक्झरी कारचा प्रेमी होता. त्याच्याकडे दोन लक्झरी कार असून त्या दोन्ही गाड्यांचा नंबर खास होता. ४७४७ हा त्याच्या दोन्ही गाड्यांचा नंबर होता. 

सुशांतची सर्वात आवडती कार म्हणजे मासेराती क्वाट्रोपोर्टे (Maserati Quattroporte) ज्याचा क्रमांक ४७४७ असा होता. सुशांतने ५० आवडत्या गोष्टींची यादी तयार केली होती. यामध्ये महागड्या गाड्यांचा समावेश होता. त्याचा लँबोर्गिनी ही महागडी कार विकत घ्यायची होती. 

बॉलिवूडच्या इतर कलाकारांप्रमाणेच सुशांत देखील मुंबईच्या वांद्रे येथे राहत होता. त्याच घर अतिशय सुंदर होतं.

सुशांतला दुसरी लक्झरी कार होती रेंज रोवर. ज्याच्या क्रमांक ४७४७ असा आहे. सुशांतचा प्रत्येक सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक काम करत होता. त्यानुसार त्याचा सिनेमा करता आकारणारे पैसे देखील दिवसेंदिवस वाढत होते. बॉलिवूडमध्ये येण्या अगोदर त्याने काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x