मिस युनिव्हर्स होणार मिसेस मोदी? सुष्मिता सेनची आली पहिली प्रतिक्रिया

'ना लग्न...ना एंगेजमेंट',ललित मोदीच्या नात्यावर काय म्हणाली सुष्मिता सेन

Updated: Jul 15, 2022, 06:11 PM IST
मिस युनिव्हर्स होणार मिसेस मोदी? सुष्मिता सेनची आली पहिली प्रतिक्रिया  title=

मुंबई : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी लग्न केल्याची चर्चा गुरूवारी सोशल मीडियावर रंगली होती. या चर्चेवर गुरूवारीच ललित मोदी यांनी डेट करत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. ललित मोदीच्या या स्पष्टीकरणानंतर आता सुष्मिता सेनने या नात्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  

ललित मोदींनी गुरूवारी ट्विटरवरुन सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोनंतर त्यांच्या नात्यांच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र ललित मोदींनी लग्न न केल्याचं स्पष्टीकरण देत ते एकमेकांना डेट करत असल्याची माहिती दिली होती. य़ा माहितीनंतर सोशल मीडियासह संपूर्ण देशभरात त्याच्या नात्याची चर्चा सुरु आहे.  

सुष्मिताची इंस्टाग्राम पोस्ट 

ललित मोदींनी त्यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर आता सुष्मिता सेनने यावर भाष्य केले आहे. सुष्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती तिच्या दोन्ही मुलींसोबत खूप आनंदी दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ती म्हणते की, ना त्याचे लग्न झाले नाहीए आणि ना एंगेजमेंट झालीय, असे सुष्मिता सेनने स्पष्ट केले आहे. 

'मी आनंदी ठिकाणी आहे... ना लग्न झालंय, ना एंगेजमेंट. जे माझ्यावर बिनशर्त प्रेम करतात त्यांच्यासोबत मी आहे. खुपच स्पष्टीकरण दिले...आता पुन्हा जीवन आणि कामावर, असे तिने पोस्टमध्य़े म्हटलेय. 

डेटींगच्या चर्चेवर काय म्हणाली?
सुष्मिता सेन आणि ललित मोदीचे फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या लग्नाच्या व एंगेजमेंट चर्चा रंगल्या होत्या. या सर्व चर्चा सुष्मिताने फेटाळल्याचे या पोस्टमधून कळत आहे. तर ललित मोदीने या नात्यावर दोघे एकमेकांना डेट करत असल्याची माहिती दिली होती. या डेटींगच्या चर्चेवर मात्र सुष्मिता मौन बाळगता दिसली आहे. डेट करत असल्याच्या चर्चेवर या पोस्टमध्ये ती काहीच म्हणाली नाही आहे. त्यामुळे दोघ डेट करत असल्याचे पुन्हा स्पष्ट होतेय.