कोर्ट मॅरेजनंतर आता Swara Bhaskar चा मोठा निर्णय!

 Swara Bhaskar च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... स्वरानं काही दिवसांपूर्वीच रजिस्टर मॅरेज केले होतं. त्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. स्वराचे ते फोटो सोशल मीडियावर झाल्याचे पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. 

Updated: Mar 4, 2023, 05:51 PM IST
कोर्ट मॅरेजनंतर आता Swara Bhaskar चा मोठा निर्णय! title=

Swara Bhaskar's Hindu Wedding : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. स्वरा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असण्याचे कारण म्हणजे तिचा विवाह. स्वरानं समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) यांच्यासोबत विवाह केला. तिनं 6 जानेवारी रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत रजिस्टर मॅरेज केलं. मात्र, त्यानंतर तिनं 16 फेब्रुवारी रोजी फोटो शेअर करत तिच्या विवाहाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. स्वराच्या रजिस्टर मॅरेजचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर अनेकांनी तिला प्रश्न विचारला की तू हिंदू परंपरेनं लग्न करणार आहेस की नाही? मात्र, यावरून तिला सतत ट्रोल करण्यांचे आता तोंड गप्प झालं आहे. ते म्हणजे स्वरा लवकरच हिंदू परंपरेनं लग्न बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याचे सगळे कार्यक्रम पुढच्या आठवड्यापासून सुरु होणार असल्याचे म्हटले जाते. (Swara Bhaskar's Indian Hindu Date)

हे पाहता स्वराच्या चाहत्यांपासून अनेकांना प्रश्न पडला आहे की स्वरा नक्की कोण कोणत्या हिंदू परंपरेचे पालन करणार आहे. खरंतर स्वरा आणि फहाद यांचे आधी लग्न झालं असताना आता ते दोघे हिंदू परंपरेन लग्न बंधनात अडकणार आहेत. तर स्वराच्या लग्नाचे कार्यक्रम हे 11 मार्चपासून 16 मार्चपर्यंत सुरु राहणार आहेत. स्वराच्या जवळच्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, स्वरा डेस्टिनेशन वेडिंग करण्या ऐवजी दिल्लीत तिच्या आजोळी सगळ्या परंपरेनुसार लग्न करणार आहे. त्या दोघांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. स्वराच्या लग्नाचं खूप मोठं सेलिब्रेशन होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, स्वराच्या लग्नात तिच्या जवळचे मित्र-मैत्रीण आणि कुटुंबातील सदस्य असतील. (Swara Bhaskar's Suhagrat Photo)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एकीकडे लग्नाची तयारी सुरु असताना दुसरीकडे स्वरानं तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा फोटो शेअर केला होता. या फोटोत फुलांनी सजवलेला स्वराचा बेड दिसत होता. तो फोटो शेअर करत 'माझी लग्नाची पहिली रात्र ही फिल्मी असायला हवी यासाठी माझ्या आईनं केलेले प्रयत्न.' स्वराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

हेही वाचा : पत्नी आणि मुलांना Nawazuddin Siddiqui नं मध्यरात्री दाखवला घरा बाहेरचा रस्ता, Video शेअर करत, म्हणाली...

स्वरा आणि फहादच्या लग्नातील फोटो पाहून नेटकरी हैराण झाले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले होते. अनेकांनी स्वराच्या फोटोवर कमेंट करत फ्रीचे इमोटीकॉन वापरतं,,, तुझ्यासोबत देखील श्रद्धावालकरसारखं होणार असे देखील म्हणाले.