मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. मात्र हा कार्यक्रम सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला आहे. टीआरपीमध्ये तर या शोने अनेकदा टॉप 5 ची जागा पटकावली आहे. मात्र आता या कार्यक्रमाची जादू काही कमी झाली आहे. या कार्यक्रमाबाबत प्रेक्षक तक्रार करताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. यावर प्रेक्षक नाराज आहेत. झालेल्या बदलावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' कार्यक्रमाची क्वालिटी आता तशी राहिलेली नाही. अनेकांनी दिग्दर्शकांना टॅग करत आपलं मत नोंदवलं आहे.
@malavrajda Sir,U r a good director but tell me honestly do u really find the new episodes of TMKOC to be funny? Where is our old funny Bapuji who made us go Rofl instead now he provides us with gyaan..Please I request u to remind the script writers that TMKOC is a comedy sitcom.
— Anirudh Garg (@garg_Nogarg) April 3, 2021
येथे एक युजरने लिहिले आहे, 'शो कॉमेडीच्या बाबतीत आता आपल्या सर्वात खालच्या पातळीवर आहे. कोणतीही स्थिती नाही आणि सीन-बार-रिपीट करताना आदित्य जेव्हा नवीन ग्रुप ज्वॉइन होता ...खूप वाईट पद्धतीने मांडलं आहे. अगदी chewing gum बनवल्या सारखं केलं आहे?
@malavrajda read the article on TMKOC about losing viewcership even i m also now regular watching the show even of Jethalal recovery of dues from Bhogilal was almost stretched for 2 months it's two
— Jignesh (@Jignesh68890582) April 3, 2021
याव्यतिरिक्त, एक युजरने सांगितले की, पात्रांच आयुष्य सेम टू सेम बघून आता आम्हाला कंटाळा आला आहे. तर यामध्ये लवकरच चांगला बदल करावा असं वाटतं