Taarak Mehta : कॅन्सरग्रस्त Nattu Kaka यांनी व्यक्त केली अखेरची इच्छा

3 महिन्यांपूर्वी कॅन्सर असल्याच डॉक्टरांनी सांगितलं

Updated: Jun 24, 2021, 10:38 AM IST
Taarak Mehta : कॅन्सरग्रस्त Nattu Kaka यांनी व्यक्त केली अखेरची इच्छा  title=

मुंबई : छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)मधील नट्टू काका (Nattu Kaka) म्हणजे घनश्याम नायक (Ghanashyam Nayak)कॅन्सरशी झुंजत आहेत. 77 वर्षांच्या नट्टू काकांच्या गळ्यावर काही स्पॉट्स दिसले. ज्यानंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाल्याची माहिती मिळाली. 

नट्टू काकांनी सांगितली अखेरची इच्छा 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

घनश्याम नायक यांच्या कुटुंबियांनी किमोथेरपी सुरू केली आहे. चाहत्यांना देखील नट्टू काका लवकर बरे व्हावेत असं वाटत आहे. याच दरम्यान नट्टू काकांनी आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. नट्टू काकांना मेकअप करूनच अखेरचा प्रवास करायचा आहे. एका कलाकाराने व्यक्त केलेली ही अखेरची इच्छा सगळ्यांचच मन हेलावणारी आहे. 

शेवटपर्यंत करायचंय काम 

घनश्याम नायक यांनी आपली अखेरची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे. तसेच त्यांचा अखेरचा प्रवास हा चेहऱ्याला रंग लावूनच करायचा आहे. नट्टू काका गेले अनेक वर्ष 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेसे जोडले गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी प्रेक्षकांच या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजन केलंय. 

तीन महिन्यांपूर्वी घनश्याम नायक यांच्या गळ्यात काही डाग दिसले. त्यानंतर त्यांनी पुढे उपचार करण्यास सुरूवात केली. एप्रिल महिन्यात त्यांच्या गळ्याची पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग केल्याची माहिती नायक यांच्या मुलाने  दिली. नायक यांनी कीमोथेरेपी सेशन्स  देखील सुरू केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रत्येक महिन्यात त्यांचं  कीमो सेशन होतं.