या 5 अभिनेत्यांनी नाकारली Taarak Mehta मधील जेठालालची भूमिका

या कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तीरेखेने प्रेक्षकांच्या मनामनात घर केले आहे.

Updated: Jul 15, 2021, 04:29 PM IST
 या 5 अभिनेत्यांनी नाकारली Taarak Mehta मधील जेठालालची भूमिका

मुंबई : Taarak mehta ka ooltah chashmah हा टीव्हीवरील सर्वात यशस्वी आणि दीर्घकाळ चालणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या टीआरपी रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर, या कार्यक्रमाने कधीही त्यांच्या निर्मात्यांना निराश केले नाही. असित कुमार मोदी आणि नीला असित मोदी हे  Taarak mehta ka ooltah chashmah चे निर्माते आहेत. त्यांनी प्रत्येक कठीण काळात त्यांच्या या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांना गुदगुल्या केल्या आहेत. त्याच बरोबर या कार्यक्रमातील अ‍ॅक्टर दिलीप जोशी आणि दिशा वाकानी यांनी त्यांच्या मजेदार केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एवढेच काय तर या कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तीरेखेने प्रेक्षकांच्या मनामनात घर केले आहे.

या कार्यक्रमातील दया भाभीची व्यक्तीरेखा साकारलेली दिशा वकाणी, अनेक काळापासून लांब राहीली आहे. त्यामुळे प्रेक्षक तिची आतुरतेने वाट पाहात आहे.

त्याच बरोबर जेठालाल म्हणजेच, दिलीप हे या कार्यक्रमातील सर्वांच्या आवडीचे आणि जवळचे पात्र आहे. जेठालालची कॉमेडी ही कौतुकास्पद आहे. त्यांनी त्यांच्या अॅक्टींगने या कार्यक्रमात आपले प्राण ओतले आहे आणि त्या व्यक्तीरेखेला एक वेगळा टच दिला आहे.

परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, या भूमिकेसाठी दिलीप जोशीला साईन करण्यापूर्वी, निर्मात्यांनी अनेक अभिनेत्यांना या भूमिकेची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी ही व्यक्तीरेखा नाकारली.

चला तर मग जाणून घेऊयात की, नक्की कोण कोणत्या कलाकारांनी ही व्यक्तीरेखा नाकारली होती.

योगेश त्रिपाठी

'भाभीजी घर पर हैं?' या कार्यक्रमामुळे योगेशला सर्वाधिक ओळखले जाते. त्यांना जेठालालच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु भाभीजीच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांने ती नाकारली.

किकू शारदा

'द कपिल शर्मा शो'मध्ये बच्छा यादवच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या किकूला सुद्धा जेठालालच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. कारण त्याला पूर्णवेळ मालिका करायची नव्हती आणि त्याला स्टॅन्ड-अप कॉमेडियन प्ले करण्यात आनंद मिळत आहे.

एहसान कुरेशी

स्टँड अप कॉमेडियन एहसान कुरेशी यांना जेठालालच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण त्याने ते अॅक्सेप्ट केले नाही. परंतु ते यासाठी का नाही बोलले याचे खरे कारण समोर आलेलं नाही.

अली असगर

अली हा एक यशस्वी टेलिव्हिजन अभिनेता आहे आणि तो कहानी घर घर की, कुटूंब, कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याला ज्येठालालच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु व्यावसायिक वचनबद्धतेमुळे त्याने ती नाकारली.

राजपाल यादव

बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट कॉमेडियन राजपालदेखील या यादीचा एक भाग आहे. जंगल, वक्त, प्यार तूने क्या किया यांसारख्या अनेक संस्मरणीय चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याला जेठालालच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.

पण त्याला टेलिव्हिजन करण्याची इच्छा नसल्यामुळे आणि त्याने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करायचे असस्याने त्याने यासाठी नकार दिला आहे.