TMKOC | आताचा स्टार, त्यावेळेस बेरोजगारीने बेहाल, जेठालालने सांगितला स्ट्रग्लस डे मधील अनुभव

या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.

Updated: Jun 30, 2021, 08:35 PM IST
TMKOC | आताचा  स्टार, त्यावेळेस बेरोजगारीने बेहाल, जेठालालने सांगितला स्ट्रग्लस डे मधील अनुभव

मुंबई: तारक मेहता का उलटा चष्मा हा प्रत्येक घरातला आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील जेठालाल हा घरोघरी आपल्या भूमिकेमुळे घरोघरी पोहोचला. मात्र जेठालाल ही भूमिका मिळण्याआधी त्याने बेरोजगारीत कसे दिवस काढले किती हालअपेष्टा सहन केल्या याचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. 'तारक मेहता का उलटा चष्मामध्ये जेठालाल सर्वांनाच आवडतो. यातील सर्वात लोकप्रिय म्हणजे जेठालालची भूमिका करणारे दिलीप जोशी. दिलीप जेशी यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

जेव्हा शो सुरू होणार होता तेव्हा आम्हा सर्वांच्या मनात एकच विचार आला की टीव्हीवर दिवसभर सासू-सूनेचं भांडण आणि नकारात्मकतेचा भाव असलेले कार्यक्रम होते. त्यात आम्हाला काहीतरी सकारात्मक आणि हलकं फुलकं ज्यामुळे लोकांचं मनोरंजन होईल आणि चांगला संदेश मिळेल असं करायचं होतं. हीच संकल्पना तारक मेहतामधून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला.

दिलीप जोशी यांना जेठालाल आणि चंपकलाल या दोघांपैकी एक रोलची निवड करण्याची संधी देण्यात आली होती. दिलीप यांच्या म्हणण्यानुसार असित मोदी यांनी सीरियलसाठी खूप प्रोत्साहीत केलं. ते खूप उत्साहित होते त्यावेळी मी सांगितलं की मी जेठालालची भूमिका करण्याचा प्रयत्न करेन त्यावेळी मोदी यांनी विश्वास दर्शवला की तू जे करशील ते उत्तमच करशील आणि आज घराघरात जेठालाल प्रसिद्ध झाला.

जेठालालची भूमिका मिळण्याआधी  दीड वर्ष दिलीप जोशी बेरोजगार होते. नाटकाचे प्रयोग संपले होते. त्यावेळी जी सीरियल सुरू होती ती बंद पडली. त्यामुळे हातात कोणतंच काम नव्हतं. हे क्षेत्र खूप जोखमीचं असल्याची जाणीव झाली. इथे कोणतीच गोष्ट स्थिर नसते. दीड वर्ष माझ्याकडे एकही काम नव्हतं. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. मला समजतही नव्हतं की मी कोणत्या नव्या क्षेत्रात काम करू शकतो. पण देवाच्या कृपेनं तारक मेहता या सीरियलसाठी मला संधी मिळाली आहे माझा कठीण काळ संपला.