करायला गेली एक, झालं एक; बबिताला चेहऱ्याची सर्जरी करणं पडलं महागात?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध शोने गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

Updated: Dec 16, 2021, 04:56 PM IST
करायला गेली एक, झालं एक;  बबिताला चेहऱ्याची सर्जरी करणं पडलं महागात? title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध शोने गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर कब्जा केला आहे. हा शो इतका लोकप्रिय झाला आहे की, त्यातील प्रत्येक पात्रांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम केलं आहे. केवळ जेठालालच नाही तर त्यांचे चाहतेही TMKOC च्या 'बबिता जी'च्या मागे वेडे झाले आहेत. त्याचवेळी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून लोकं तिला ओळखूच शकत नाहीत. 

बबिता झाली बार्बी डॉल
अभिनेत्री मुनमुन दत्ता ही सोशल मीडिया प्रेमी आहे हे सर्वांना माहीत आहे. ती दररोज सोशल मीडियावर काहीतरी शेअर करत असते. ज्याचं कौतुक करताना चाहते थकत नाहीत. आता मुनमुन दत्ताचा एक व्हिडिओ ट्रेंड होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या बार्बी डॉल लूकने लोकांची मने जिंकत आहे. 

प्रसिद्ध गाण्यावर सीन
या व्हिडिओमध्ये मुनमुनने कार्टून फिल्टर लावला आहे. यात तिचे डोळे मोठे दिसत आहेत आणि तिचा चेहरा बार्बी गर्लसारखा दिसत आहे. ती 90 च्या दशकातील प्रसिद्ध गाणं 'आय एम अ बार्बी गर्ल' वर परफॉर्मन्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकं कमेंटमध्ये म्हणत आहेत की, फिल्टर नसतो तेव्हादेखील मुनमुन बाहुलीसारखी दिसते. त्यांना त्याची गरज नाही. त्याचबरोबर, काही युजर्सने तिला चेहऱ्याच्या सर्जरीबद्दल विचारलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुनमुन दत्ताचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर इतकी लोकप्रिय आहे की तिची प्रत्येक पोस्ट समोर येताच व्हायरल होते. शोमधील तिच्या भूमिकेतून ती सतत लोकांचे मनोरंजन करते.