Sharad Kelkar Birthday Special: तान्हाजी (Tanhaji) या भव्यदिव्य चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका करत अभिनेता शरद केळकरनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आपल्या उत्तम अभिनयानं आणि आवाजानं तसेच भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळं शरद आज लाखो तरूणींच्या काळजाचा तुकडा बनला आहे (Sharad Kelkar as Chhatrapati Shivaji Maharaj). शरद केळकरला आज कोण नाही ओळखत? त्याच्या प्रत्येक भुमिकेतून शरदनं त्याच्या चाहत्यांच्या मनात एक अनन्यसाधारण असं स्थान निर्माण केलं आहे. आज तो बॉलीवूडमधला सर्वात लोकप्रिय व्हॉईस ओवर आर्टिस्ट (Voice over artist) आहे. त्याचा जन्म 7 ऑक्टोबर 1976 साली झाला. (tanhaji actor sharad kelkar is ruling bollywood with his voice who rejected for stammering)
पण तुम्हाला माहितीये का की एकेकाळी अडखळत किंवा तोतरं बोलण्यावरून शरदला अनेकदा रिजेक्शनला सामोरं जावं लागलं आहे. परंतु या रिजेक्शनचा कटू अनुभव जरी आपल्या पदरी असला तरी त्यातून सावरत शरदनं लाखोच्या हृदयात अनन्यसाधारण स्थान निर्माण केलं आहे. आज तुमच्या या हॅण्डसम हंक हिरोचा वाढदिवस आहे. तेव्हा जाणून घेऊया शरद केळकरबद्दल हे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स. (Sharad Kelkar Interesting Facts)
तान्हाजी चित्रपटातील भुमिकेनंतर शरद केळकराचा ददारा हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच वाढला. लक्ष्मी (Sharad Kelkar in Laxmi) या चित्रपटातून त्यानं किन्नराची भुमिका साकारली होती. त्यातील त्याच्या छोट्याशा भुमिकेचही सर्वत्र कौतुक केले गेले. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) असतानाही शरद केळकरची भुमिका त्याच्यापेक्षाही प्रेक्षकांना भारी वाटली होती. त्यातून द फॅमिली मॅन (The Family Man) या वेबसिरिजमधूनही त्यानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. लय भारी (Sharad Kelkar in Laai Bhaari) चित्रपटातून खलनायकाची भुमिका केल्यानंतर संग्राम ही भुमिका घराघरात पोहचली, हा चेहरी नीट लक्षात ठेव संग्राम, हा संवाद ऐकला तरी आपल्या डोळ्यासमोर शरद केळकरच उभा राहतो.
शरदनं 2004 साली आलेल्या हलचल (Hulchul) या चित्रपटातून कॉमियो केला होता. त्याआधी त्यानं दूरदर्शनवरील आक्रोश या मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले (Sharad Kelkar Debut) आणि त्यानंतर त्यानं मागे वळून कधीच पाहिले नाही त्यानं त्यानंतर लोकप्रिय आणि हीट मालिका केल्या. हिंदी - मराठी मालिका, चित्रपटातून आणि वेब सिरिजमधून शरदनं अभुतपुर्व असं यश प्राप्त केलं आहे. आता तो हर हर महादेव या चित्रपटातून बाजीप्रभू देशपांडे यांची भुमिका करतो आहे.