टेरेन्स- नोराच्या नात्यातलं सत्य अखेर समोर; स्वत: म्हणाला... 'सिक्रेट राहू द्या'...

बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Updated: May 4, 2022, 01:24 PM IST
टेरेन्स- नोराच्या नात्यातलं सत्य अखेर समोर; स्वत: म्हणाला... 'सिक्रेट राहू द्या'... title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आज प्रत्येकाला तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल जाणून घ्यायचं आहे. पण तिचं नाव टेरेन्स लुईससह अनेक सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलं आहे. अलीकडेच टेरेन्सने स्वतःच्या नात्याचा खुलासा केला आहे.

टेरेन्सने तोडलं मौन 
प्रसिद्ध डान्सर टेरेन्स लुईसचं नाव अभिनेत्री नोरा फतेहीशी जोडलं जात आहे. दोघंही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.  या दोघांबद्दल चाहते अंदाज बांधत असतात. मात्र, टेरेन्स किंवा नोराच्या बाजूने याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर आता टेरेन्सने यावर मौन सोडलं आहे. तो असं काही बोलून गेला आहे की,  जे ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं.

'सिक्रेट, सिक्रेटच राहू द्या'
खरंतर, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, टेरेन्स लुईसला विचारण्यात आलं की, तो आणि नोरा कधी रिलेशनशिपमध्ये होते का? यावर उत्तर देत टेरेन्स म्हणाला की, 'सिक्रेट आहे सिक्रेटच राहू द्या, मी तुम्हाला ऑफ कॅमेरा सांगेन. यानंतर टेरेन्सने पुढे सांगितलं की ती माझी फक्त चांगली मैत्रिण आहे. आणखी आमच्या नात्यात काही नाही. त्याचबरोबर, टेरेन्सला प्रश्न विचारण्यात आला की,  तुम्ही दोघं एकत्र चांगले दिसतात. यावर टेरेन्स म्हणाला, 'मला वाटतं की, पडद्यावर आमची केमिस्ट्री चांगली दिसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. मला तिचा स्टॅमिना खूप आवडतो. आणि यामुळेच ती डान्सर झाली आहे. त्यामुळे तिला हे समजते. ती खूप मेहनतीही आहे.