सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्या नंदा पोहचले ब्राझीलमध्ये, 'या' देसी गाण्यावर धरला ठेका

The Archies Dance in Brazil for Tudum 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे आर्चिज, या चित्रपटाची. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तेव्हा आता या चित्रपटाच्या स्टारकास्टनं ब्राझीलमध्ये ठुमका धरला होता. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 19, 2023, 11:10 PM IST
सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्या नंदा पोहचले ब्राझीलमध्ये, 'या' देसी गाण्यावर धरला ठेका title=
June 19, 2023 | the archies cast dance performance at brazil for netfilx tudum 2023

The Archies Dance in Brazil: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे नेटफ्लिक्सवर येणाऱ्या 'द आर्चिज' या चित्रपटाची. दोन वर्षांपुर्वी हा चित्रपट येणार असल्याची घोषणा झाली होती. तेवढ्यातच या चित्रपटातून तीन स्टारकीड्स येणार आहेत. यावरून बराच गदारोळ झाला होता. सुहाना खान म्हणजे शाहरूख खानची मुलगी, अगस्त्या नंदा म्हणजे अमिताभा बच्चन यांचा नातू आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर या चित्रपटातून पदार्पण करणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी, एकाच चित्रपटातून तीन तीन स्टारकीड्स येणार म्हटल्यावर अनेकांनी या तिघांना ट्रोलही करायला सुरूवात केली त्यामुळे सोशल मीडियावर नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला होता. यावेळी पुन्हा त्यावरून त्यांना टार्गेट केले होते. 

परंतु आता या चित्रपटाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून लव्ह, रिलेशनशिप्स आणि ब्रेकअप अशा अनेक तऱ्हेच्या तरूणपिढीच्या निर्णयावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्यानं याकडे तरूणपिढी फारस उत्साहानं पाहते आहे. परंतु त्याचसोबत हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर मात्र याकडे अनेकांनी परत टीकाही केली आहे. भारतात घडणारा 'द आर्चिज' आहे तेव्हा त्याकाळी म्हणजेच 1964 मध्ये भारत खरंच इतका पुढारलेला होता का की तेव्हा पॉपटेट्स, पार्टी, ग्लॅमर आणि तरूणपिढी इतकी पुढारलेली होती. परंतु यावरून जरी सोशल मीडियावर मतभिन्नता असली तरीसुद्धा समोर आलेल्या टीझरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादही दिला आहे.  'द आर्चिज' ही फ्रॅन्चाईस आता ग्लोबल झाली आहे. 

आणि ही फ्रॅन्चाईस भारतामध्ये येते आहे. त्यामुळे त्या पाश्चात्त्य लाईफस्टाईलचे भारतीयकरण करण्यात आले आहे. त्यातून रिव्हरलडेल हे शहर भारतात आलं आहे. ही काल्पनिक कथा सोडली तर यातून नक्की काय समोर येणार आहे हे लवकरच चित्रपटातून समोर येणार आहे. परंतु सध्या चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटाच्या स्टारकास्टनं ब्राझीलमध्ये केलेल्या डान्सची. सध्या ब्राझीलमघ्ये नेटफ्लिक्सचा टुडुम 2023 हा फेस्टिवल सुरू झाला आहे. तेव्हा यावेळी या चित्रपटाच्या स्टारकास्टनं ब्राझीलमध्ये मनसोक्त डान्स केला. सध्या त्यांचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खुशी कपूर, सुहाना खान, अगस्त्या नंदा यांच्यासह अदिति डॉट, मिहिर आहूजा, वेदांग रैना आणि युवराज मेंडा यावेळी या इव्हेंडला उपस्थित होते. यावेळी त्यांनी या चित्रपटातील 'सुनो' या गाण्यावर ठेका धरला. यावेळी त्यांनी त्यांच्या चित्रपटातील वेशभूषा साकारली होती.