अभिनेत्रीने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने दिग्दर्शकाने उचललं हे पाऊल

'गॉडफादर' नसलेल्या अभिनेत्रींना करावा लागतो भयानक गोष्टींचा सामना

Updated: Oct 30, 2021, 01:07 PM IST
अभिनेत्रीने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने दिग्दर्शकाने उचललं हे पाऊल title=

मुंबई : बॉलिवूड म्हटलं की, ग्लॅमर, प्रसिद्धी, सौंदर्य यासर्व चांगल्या गोष्टींसोबत एक कटू सत्य म्हणजे कलाकारांच्या  वाट्याला येणारा कास्टिंग काऊचचा अनुभव. कित्येक कलाकारांना ब्रेक हवा असल्यामुळे कँप्रोमाईज या शब्दाचा सामना करावा लागतो. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कास्टिंग काऊचबद्दल आलेले अनुभव उघडपणे सांगितले आहेत. अभिनेत्री ईशा गुप्ताने (Esha Gupta)  देखील कास्टिंग काऊचबद्दल स्वतःचा अनुभव सांगितला.  

ईशा गुप्ताने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील काळे सत्य उघड केले. ईशा म्हणाली, 'बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध निर्मात्याला मला चित्रपटातून काढून टाकायचे होते कारण मी त्याच्यासोबत राहण्यास आणि शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला होता. ईशाने सांगितले की, स्ट्रगलच्या दिवसांमध्ये मी मेकअप आर्टिस्टसोबत माझी रूम शेअर करायचे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ईशा पुढे म्हणाली, तेव्हा मी अनेकांना कारणं दिली मी घाबरली होती  त्यामुळे मी इथे एकटी झोपू शकणार नाही. पण प्रत्यक्षात मला कुणा भूताची भीती नव्हती तर त्या माणसाची भीती वाटत होती. तिच्या भीतीबद्दल बोलताना ईशा म्हणाली, 'मी एका व्यक्तीचे घाणेरडे रूप पाहिले होते, त्यामुळे मी खूप घाबरले होते. 

'चित्रपटाच्या शूटिंगच्या मधल्या काळात निर्मात्याने मला सांगितले की, त्याला माझ्यासोबत काम करायचे नाही. तोपर्यंत मी 5 दिवस शूट केले होते. खरं तर, मी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याला मला चित्रपटातून काढून टाकायचे होते. एवढंच नाही तर बॉलिवूडमधील स्टारकिड्सना या गोष्टींचा सामना करावा लागत नसल्याचं देखील तिने सांगितलं.

ईशा म्हणाली, 'स्टारकिड्सना काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही. कारण त्यांना त्यांच्या पालकांचा रोष सहन करावा लागेल. पण बाहेरच्या लोकांच्या असहायतेचा फायदा घेतला जातो.' ईशाने 'जन्नत 2' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. ईशाने 'राज 3डी', 'रुस्तम', 'बादशाहो', 'कमांडो 2'  शिवाय काही तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.