मुंबई : टेरेंन्स लुईस, मलायका अरोरा आणि गीता कपूर या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. तिघंही भारतातील बेस्ट डान्सर सीझन 2 आणत आहेत आणि या शोच्या प्रमोशनसाठी तिन्ही जज कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचलेत. या स्पेशल एपिसोडचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, पण आता समोर आलेला प्रोमो पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने शोमध्ये उभं राहून टेरेन्स लुईसच्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत. ही बाब एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर त्याने टेरेंसकडे 50 हजार रुपयांची मागणी केली आणि तोपर्यंत शो सुरू होऊ न देण्याची धमकीही दिली.
टेरेंसवर फसवणुकीचे आरोप
शोचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यात दाखवण्यात आलं आहे की, प्रेक्षकांमध्ये बसलेली एक व्यक्ती उभी राहते आणि आरोप करते की टेरेन्स लुईसच्या टीमने ऑडिशनमध्ये निवड होण्याच्या नावाखाली त्याच्याकडे 50 हजार रुपये मागितले होते आणि त्यानेही पैसे दिले. त्याने कपिल शर्मा शोच्या स्टेजवर येऊन पैशाच्या व्यवहाराची पावतीही दाखवली, त्यानंतर लोक खरोखरच विश्वास ठेवू लागले की, ही व्यक्ती कदाचित बरोबर बोलत आहे. मात्र, टेरेन्स लुईसने देखील आश्वासन दिलं की, जर खरोखरच असं काही घडलं असेल तर ते या प्रकरणाची चौकशी करतील. पण त्या व्यक्तीने त्याच्याकडे 50 हजारांची मागणी केली आणि जोपर्यंत त्याला पैसे मिळत नाहीत तोपर्यंत शो सुरू होऊ देणार नाही असा आग्रह धरला.
कपिलने उघडलं गुपित
शेवटी, जेव्हा गोंधळ वाढला, तेव्हा कपिल शर्मा उठला आणि म्हणाला की, त्याला काहीतरी बोलायचं आहे. आणि तो म्हणाला की ... तो एक उत्तम अभिनेता आहे आणि जे काही घडत आहे ते फक्त टेरेन्स लुईस बरोबर एक विनोद होता. हे सगळं कळल्यावर सगळेच स्तब्ध झाले. कोणालाही विश्वास बसत नव्हता की तो खरोखर एक्टिंग करत होता, प्रत्येकाला वाटलं की, ती व्यक्ती खरं बोलत आहे.