'गाफील' चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

'गाफील' या नावातच ताकद असल्याने प्रेक्षकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. नवोदित कलाकार आदित्य राज आणि अभिनेत्री वैष्णवी बरडे या दोघांच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल. 

Updated: Nov 23, 2023, 12:19 PM IST
'गाफील' चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : सध्या एकापाठो पाठ एक सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. झिम्मा २, मुसाफिर, एकदा येन तर बघा अनेक सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच  'गाफील' या आगामी मराठी चित्रपटाचे टीझर नुकतंच रिलीज करण्यात आलं आणि काही अवधितच या टीझरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आदित्य या तरूणाच्या आयुष्याभवती फिरणारी कथा या टीझरमध्ये दिसून येते. तसेच हा टीझर अनेक प्रश्न‌ मनात ठेवून जातो. उत्सुकता वाढवणारा हा टिझर अवघ्या काही वेळातच व्हायरल झाला आहे. येत्या १५ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'गाफील' या नावातच ताकद असल्याने प्रेक्षकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. नवोदित कलाकार आदित्य राज आणि अभिनेत्री वैष्णवी बरडे या दोघांच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल. मात्र, त्यांचं नक्की नातं काय हा प्रश्न औत्सुक्याचा ठरतो. काहीसा ऐशोआरामात राहणारा, आजूबाजूला सतत मुलींचं जाळं असणारा नायक अचानक बदलतो, याचं कारण काय, ती मुलगी नक्की कोण आहे, असे अनेक प्रश्न टीझर पाहिल्यावर आपल्या मनात येतील. त्यामुळे आता प्रेक्षक ट्रेलरच्या प्रतिक्षेत आहेत. 

टीझर आणि म्युझिक लॉन्चचा कार्यक्रम अमरावती येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री, विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे पाटील उपस्थित होते. तसेच स्टार प्रवाहचे कार्यकारी निर्माते नरेंद्र मुधोळकर यांची विशेष उपस्थिती होती.  धरती फिल्मस प्रस्तुत व निर्मित, मॅड आर्क पिक्चर्स सहनिर्मित 'गाफील' या चित्रपटाचे निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल हे आहेत, तर मिलिंद अशोक ढोके हे चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. १५ डिसेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

'गाफील' असं काहीसं उत्सुकता वाढवणारं नाव असलेला चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला. याआधी  या सिनेमाचं अमरावती येथील प्रसिद्ध तापडिया सिटी सेंटर मॉलमध्ये अमरावतीचे ज्येष्ठ फिल्म वितरक आणि तापडिया मॉल चे डायरेक्टर श्री. लक्ष्मीकांत लढ्ढा यांच्या हस्ते फिल्मच्या मुख्य पोस्टरचं अनावरण करण्यात आलं होतं.  पण नक्की कोण कोणापासून गाफील आहे, हे मात्र चित्रपट बघितल्यावरच लक्षात येईल. चित्रपटाच्या ‘गाफील’ या नावामुळेच प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट नक्की कोणत्या विषयाशी निगडीत असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x