टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्याचा अपघात

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या दमदार एक्शन आणि फिटनेससाठी ओळखला जातो.

Updated: Oct 31, 2022, 08:03 PM IST
टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्याचा अपघात title=

Tiger Shroff Injured : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या दमदार एक्शन आणि फिटनेससाठी ओळखला जातो. मात्र, काहीवेळा शूटिंग अॅक्शन अभिनेत्यासाठी जबरदस्त ठरते आणि यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. खरंतर, टायगर श्रॉफच्या अॅक्शन सीन शूटदरम्यान पायाला दुखापत झाली आहे. खुद्द टायगरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत
अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अॅक्शन सीन शूट करताना दिसत आहे. शूटिंगदरम्यान वॉश बेसिन तुटल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. व्हिडिओमध्ये, कलाकार खलनायकाशी भांडत आहे. अचानक तो वॉश बेसिन तोडण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे त्याच्या पायाला दुखापत होते. 

व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत टायगरने लिहिलं, काँक्रीट वॉश बेसिन तोडताना माझ्या पायाला दुखापत झाली. मला वाटलं की, मी ते करेन आणि मला अधिक स्ट्राँन्ग वाटत होतं. मी वॉश बेसिन देखील तोडली असं मला म्हणायचं असलं तरी.

टायगरचा हा व्हिडिओ जुना असल्याचं दिसत आहे. कारण त्याच्या या पोस्टवर साबीर खानने लिहिलं की, 'या दिवशी आम्ही 24 तास सतत शूटिंग केलं. त्याचबरोबर अभिनेत्याने व्हिडिओ अपलोड केल्यानंतर चाहते संतापले आहेत. तो लवकर बरा व्हावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टायगरचं वर्कफ्रंट
तरुणांच्या मनावर राज्य करणारा टायगर श्रॉफ लवकरच 'गणपत' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार देखील आहे. अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. राम सेतूला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि कमाईच्या बाबतीत तो सातत्याने वाढ होत आहे.